WB Elections : नंदीग्राममध्ये केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या निवडणूक रॅलीवर हल्ला, भाजपचा कार्यकर्ता जखमी; TMC वर आरोप

पोलिसनामा ऑनलाईन, दि. 18 मार्च 2021 – पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीदरम्यान राजकीय हिंसाचाराचा टप्पा सुरू आहे. आता राज्यातील सर्वात हायप्रोफाइल जागा समजल्या जाणार्‍या नंदीग्राममध्ये केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या निवडणूक प्रचार रॅलीवर हल्ला झाला आहे. हा हल्ला तृणमूल काँग्रेस अर्थात टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे, असा आरोप होत आहे. या हल्ल्यात एक भाजप कार्यकर्ता गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नंदीग्राम -1 दक्षिण मंडळाचे युवा प्रमुख पूरण चंद्र पात्रो यांचे डोके फाटले आहे. नंदिग्रामच्या सोनचूरामध्ये होणार्‍या केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या निवडणूक सभेत ते उपस्थित होते. केंद्रीय मंत्र्यांनी जखमी कार्यकर्त्यांला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी नि: पक्ष निवडणुका व्हाव्यात याकरिता निमलष्करी दलाची संख्या वाढवण्याची मागणी केली आहे.

यापूर्वी उत्तर 24 परगनातील जगदल येथे बॉम्ब हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात एका मुलासह तिघे जखमी झाले आहेत. हा हल्ला ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी भाजप खासदार अर्जुन सिंह यांच्या घरापासून दूर नाही. या हल्ल्याची तक्रार भाजप निवडणूक आयोगाकडे करणार आहे.

बुधवारी रात्री उत्तर 24 परगना जिल्ह्यातील जगदल भागात 18 नंबरच्या रस्त्यावर ही घटना घडली आहे. ज्यात 3 लोक जखमी झाले आहेत आणि हे ठिकाण बॅरेकपूर येथील भाजपचे खासदार अर्जुन सिंह यांच्या घरापासून दूर नाही. बॉम्बस्फोटाच्या घटनेबाबत भाजपचे खासदार अर्जुन सिंह म्हणाले की, सुमारे 15 ठिकाणी बॉम्ब फेकले गेले आणि सीसीटीव्ही कॅमेरे तुटले आहेत.

हल्ल्याबाबत भाजपचे खासदार अर्जुन सिंह म्हणाले की, आम्ही गेल्या 10 ते 12 दिवसांपासून पोलिसांना माहिती देत आहोत. पणप पोलिसांनी कोणतेही पाऊल उचलले नाही. आम्ही निवडणूक आयोगालाही सांगितले होते. आणि यावेळी पुन्हा बॉम्बस्फोटाची घटना घडली. या हल्ल्यात एका मुलासह तिघेजण जखमी झाले आहेत. वस्तुतः पोलिसांनी कोणतेही पाऊल उचलले नाही, ते सत्ताधारी पक्षाच्या सूचनेनुसार हे करीत आहेत.

पोलिसांनी याविरोधात पावले उचलली नाहीत तर हा खेळ खूप धोकादायक होईल आणि तृणमूल काँग्रेस व त्यांचे गुंड संपतील, असा इशाराही भाजप खासदार अर्जुन सिंह यांनी दिलाय. जनतेला आपली मते देऊ नये म्हणून भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या नंदीग्राममधील निवडणूक रॅलीवर हल्ला झाला असून हा हल्ला तृणमूल काँग्रेस अर्थात टीएमसी च्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. या हल्ल्यात एक भाजप कार्यकर्ता गंभीर जखमी झाला आहे. सध्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुका सुरू आहेत. यात खरी टक्कर आहे ती टीएमसी अर्थात तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात. भाजप काहीही करून पश्चिम बंगाल मध्ये सत्ता स्थापन करू इच्छित आहे, त्यासाठी ते काहीही करतील, असेही बोलले जात आहे. तृणमूल काँग्रेसने देखील या निवडणुकीत सत्ता आपल्याकडे ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तसेच समोरच्या तगड्या भाजपला या निवडणुकीतून आव्हान देत आहेत.