काय सांगता ! होय, पार्क मधून अभिषेक बच्चनला पोलिसांनी काढलं बाहेर?

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग लखनऊ येथे करत आहे. एका बागेत त्याच्या चित्रपटाच्या  सीनचे चित्रीकरण सुरु असताना अचानक पोलिस तेथे आले आणि त्यांनी चित्रीकरण थांबवण्यास सांगितले. चित्रपटाच्या शूटिंगची परवानगी घेण्यात आली असून देखील लखनऊ पोलीसांनी चित्रीकरण थांबले.

15_04_2021-film_shooting_in_lucknow_21560326_103129645.jpg

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार लखनऊ येथील बेगम हजरत महल पार्कमध्ये १४ एप्रिल, २०२१ च्या संध्याकाळी एका चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होते ज्यात  अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत आहे. एका अज्ञात इसमाने स्थानिक पोलीसांना पार्कमध्ये चित्रीकरण सुरु असल्याची माहिती दिली व ते पोलिस लगेच तेथे पोहोचले आणि त्यांनी चित्रपटाचे चित्रीकरण थांबवले.

l-l-a-b-l-ii_1618430677.webp

सेंट्रल झोनच्या डीसीपी सुमन वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक बच्चनच्या चित्रपटाचे चित्रीकरण ज्यावेळी सुरु होते, त्यावेळी तेथे ५० ते ६० लोकं उपस्थित होते व त्यांच्याकडे शूटिंग करण्याची परवानगी होती. मात्र पोलिसांनी ते शूटिंग थांबवण्याचे आदेश दिले.

नुकतेच अभिषेकने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली ज्यात तो लखनऊ च्या एका बागेत बसलेला दिसत आहे. या फोटो मध्ये अभिषेक ने चेहऱ्यावर मास्क लावला असून एक चांगले कॅपशन या खाली लिहिले आहे. त्याने लिहिले कि, “कृपया मास्क लावा. जर तुम्हाला तुमच्यासाठी नसेल लावायचे तर कुटुंबीयांचा, घरातील थोरल्या-मोठ्यांचा, मित्रांचा विचार करुन तरी लावा.”बहुतेक पोलिसांच्या येण्यानंतर अभिषेकने हि पोस्ट टाकली असावी असा अंदाज लावण्यात येत आहे.

अभिषेकाचे हे फोटोस तुम्ही पहिले का?