तुमच्या शरीरात खूप वेळ राहू शकतो कोरोना व्हायरस; जाणून घ्या ‘Long Covid’ चे लक्षण

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरसचा कहर अजूनही संपलेला नाही. कोरोनाची लस आल्यापासून थोडासा दिलासा मिळाला आहे; परंतु धोका पूर्णपणे टळलेला नाही. नुकत्याच झालेल्या संशोधनातून असे समोर आले आहे की, कोविड १९ पासून बरे झाल्यानंतरही त्याची लक्षणे अनेक आठवडे आणि महिने तशीच राहतात.

जाणून घ्या Long Covid म्हणजे काय?
Long Covid ती स्थिती आहे, ज्यात विषाणूच्या तावडीतून मुक्त झाल्यावर आणि नकारात्मक परिणाम उद्भवल्यानंतरही लक्षणे टिकून राहतात. ‘नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर फेल्ट अँड केअर एक्सलन्स’ च्या अनुसार याचे लक्षण १२ आठवड्यांपेक्षा अधिक काळ राहू शकतात. काही लोकांचे असे म्हणणे आहे की, ८ आठवड्यांपेक्षा जास्त काळ लक्षणे दिसत असतील ते Long Covid चे संकेत असू शकतात.

Long Covid मुळे दीर्घकाळापर्यंत आजारी असणाऱ्या लोकांना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतो. याचा परिणाम फुफ्फुस, हृदय, मूत्रपिंड अथवा मेंदूवर होतो.

Covid ला इतका वेळ लागतो Long Covid होण्यासाठी?

‘नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ अ‍ॅड केअर’ यांनी मार्गदर्शक सूचनांमध्ये असे म्हटले आहे की, कोरोना व्हायरस संसर्गानंतर १२ आठवड्यांनंतर Long Covid टिकू शकतात.

ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक अनुसार, ५ कोरोना व्हायरस संक्रमित रोग्यांमधील एकामध्ये पाच आठवडे अथवा त्यापेक्षा अधिक वेळापर्यंत लक्षणे दिसतात आणि दर १० मध्ये एका संक्रमित व्यक्तीमध्ये १२ आठवडे अथवा त्यापेक्षा जास्त काळ लक्षणे दिसतात.

एका स्टडीनुसार, ५१६३ अशा लोकांशी संपर्क केला गेला, जे खूप दिवसांपासून आजारी होते आणि अशी गोष्ट समोर आली की, ७५% पेक्षा अधिक लोक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत अथवा लक्षणांच्या आधारे डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले आहेत. संशोधनानुसार, समाविष्ट असलेल्या १०० रुग्णांमध्ये ही लक्षणे आढळले आहेत, परंतु हे लोक कोरोनाशी संबंधित नव्हते.

वेगवेगळी लक्षणे आणि त्यांचा क्रम

इंडियाना युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये असोसिएट रिसर्च प्रोफेसर नताली लैबर्ट यांचे म्हणणे आहे की, त्या दर आठवड्याला या लक्षणांवर लक्ष ठेऊन आहेत कारण यासाठी डॉक्टरांकडून मदत घेतली जाऊ शकेल. लेबर्टच्या म्हणण्यानुसार, यानंतर पोट अस्वस्थ होणे, चक्कर येणे अथवा उलट्या झाल्यासारखे वाटते.

>>१० दिवसांनंतर, कन्फ्यूजन, ब्रेन फॉग, गुढगेदुखी होऊ लागते.
त्यानंतर
>>१५ दिवसांत हाय आणि लो ब्लड प्रेशर, हार्ट रेट वाढणे आणि बेशुद्ध होणे अशी लक्षणे दिसू लागतात.
>> २१ दिवसांनंतर संक्रमित लोकांना असामान्य लक्षणे जसे की माऊथ अल्सर, डोळ्यांचे संक्रमण आणि स्किन प्रॉब्लेम दिसू लागतात. ज्याला covid tone नावाने ओळखले जाते.