WhatsApp च्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये तुमच्याकडे दोनच ऑपशन; अ‍ॅक्सेप्ट करा किंवा तुमचे अकाऊंट होईल डिलीट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात पॉप्युलर अ‍ॅप व्हॉट्सअप आपल्या यूजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असते. यावर्षी अ‍ॅपमध्ये अनेक फीचर्स येणार आहेत. व्हॉट्सअप लवकरच आपली नवीन प्रायव्हसी पॉलिसी घेऊन येत आहे. जर यूजर्सने ही पॉलिसी अ‍ॅक्सेप्ट केली नाही तर त्यांना अ‍ॅप डिलीट करावे लागेल. या नवीन प्रायव्हसी पॉलिसीमध्ये काय खास आहे ते जाणून घेवूयात…

व्हॉट्सअपच्या नव्या टर्म्स आणि प्रायव्हसी पॉलिसी
व्हॉट्सअप यूजर्सला अ‍ॅपच्या नव्या टर्म आणि प्रायव्हसी पॉलिसीला लवकरच अ‍ॅग्री करावे लागेल. असे म्हटले जात आहे की, जर तुम्ही या प्रायव्हसी पॉलिसीशी अ‍ॅग्री नसाल तर व्हॉट्सअप यूज करू शकणार नाही. WABetaInfo नुसार, व्हॉट्सअप 8 फेब्रुवारी 2021 ला आपल्या टर्म्स ऑफ सर्व्हिस अपडेट करणार आहे. जर व्हॉट्सअप यूजर्स याच्याशी सहमत नसतील तर ते व्हॉट्सअप वापरू शकणार नाहीत.

पॉलिसीत हे आहे महत्वाचे
व्हॉट्सअपच्या नव्या पॉलिसीमध्ये यूजर्सला जे लायसन्स दिले जात आहेत त्यामध्ये म्हटले आहे की, आमच्या सेवा वापरण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअपला, जो कंटेंट अपलोड, सबमिट, स्टोअर, पाठवता किंवा प्राप्त करता, त्यांचा वापर, रिप्रोड्यूस, डिस्ट्रीब्यूट आणि डिस्प्लेसाठी जगभरात, नॉन-एक्सक्लूझिव्ह, रॉयल्टी फ्री, सब्लिसेंसेबल आणि ट्रान्सफरेबल लायसन्स दिले जात आहे.

सध्या यूजर्सकडे आहे ऑपशन
व्हॉट्सअपमध्ये यूजर्सकडे सध्या नॉट नाऊ चे ऑपशन आहे. म्हणजे जर यूजर्सला हवे असेल तर ते यास अ‍ॅक्सेप्ट करणार नाहीत. अ‍ॅक्सेप्ट केले नाही तरी अ‍ॅप चालत राहते. याशिवाय नव्या पॉलिसी अंतर्गत फेसबुक आणि इंस्टाग्रामचे इंटीग्रेशन होईल. व्हॉट्सअपचा डेटा सुद्धा फेसबुकसोबत सामायिक होत होता. परंतु आता फेसबुकसोबत व्हॉट्सअप आणि इन्स्टाग्रामचे इंटीग्रेशन पहिल्यापेक्षा जास्त होईल.