WhatsApp यूजरसाठी खुशखबर ! लवकरच विना इंटरनेट करू शकता कॉल, जाणून घ्या कशी होईल ही कमाल

नवी दिल्ली : मोठ्या प्रतिक्षेनंतर व्हॉट्सअ‍ॅपने नुकतेच डेस्कटॉप अ‍ॅपमध्ये व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलिंग कॉलिंग फीचर अपडेट केले आहे. याचा अर्थ आहे की, व्हॉट्सअ‍ॅप यूजर्स डेस्कटॉप अ‍ॅपद्वारे आपल्या मित्रांना आणि आप्तांना कॉल करून बोलू शकतात.

मात्र, डेस्कटॉप अ‍ॅपवरून कॉल करण्यासाठी तुमच्या डिव्हाईसमध्ये मायक्रोफोन आणि वेबकॅमचा सपोर्ट असायला हवा. यानंतर आपल्या लॅपटॉप किंवा कम्प्यूटरवरून कुणाशीही वन टू वन व्हॉईस किंवा व्हिडिओ कॉलद्वारे बोलू शकता. मात्र, अजूनपर्यंत डेस्कटॉप व्हर्जनमध्ये ग्रुपवर व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलिंग सपोर्ट मिळालेला नाही म्हणजे तुम्ही एकावेळी केवळ एकाच यूजरला कॉल करू शकता. मात्र, कंपनीने यूजर्सला चांगला अनुभव देण्यासाठी यामध्ये पोर्ट्रेट आणि लँडस्केप दोन्ही ऑपशन दिले आहे. याशिवाय तुम्ही काही दिवसानंतर तुमच्या फोनमध्ये इंटरनेट नसले तरी सुद्धा व्हिडिओ आणि व्हॉईस कॉल करू शकता.

विना इंटरनेट सुद्धा होऊ शकतो कॉल
व्हॉट्सअ‍ॅपशी संबंधीत प्रत्येक माहिती देणारी वेबसाइट WABetaInfo ने याबाबतची माहिती ट्विट करून दिली आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, तुमचा फोन इंटरनेटशी कनेक्ट नसेल तरी तुमच्या डेस्कटॉप कॉलमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. फ्यूचर अपडेट्समध्ये मल्टी डिव्हाइस सपोर्ट आल्यानंतर तुम्ही फोनमध्ये इंटरनेट नसताना सुद्धा कॉल आणि मॅसेज करू शकता.

काय आहे मल्टी डिव्हाइस सपोर्ट
व्हॉट्सअ‍ॅप मोठ्या कालावधीपासून मल्टी डिव्हाइस सपोर्टवर काम करत आहे आणि अपेक्षा आहे की, ते लवकरच लाँच केले जाईल. या फीचरची सर्वात खास गोष्ट ही आहे की, यामध्ये मेन डिव्हाइसमध्ये इंटरनेट नसतानाही ते डिव्हाइसमध्ये काम करेल. हे फीचर व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा व्हर्जन 2.21.1.1 मध्ये स्पॉट केले होते.

कुणीही ऐकू शकणार नाही तुमचा कॉल
व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या प्रायव्हसीनंतर लागोपाठ ज्याबाबत प्रश्न उपस्थित केला जात होता, त्यावर कंपनीने म्हटले की, यूजर्सच्या चॅट प्रमाणे व्हिडिओ आणि व्हॉईस कॉल सुद्धा एंड टू एंड एनक्रिप्टेड असतील. कंपनीने तर व्हिडिओ कॉल्सवर लक्ष ठेवत नाही आणि ऐकतही नाही.