WhatsApp वेबवर लिंक केली गेली बायोमेट्रिक सिक्युरिटी लेयर, प्रायव्हसी होणार आणखी मजबूत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हॉट्सॲपने व्हॉट्सॲप वेब आणि डेस्कटॉपवर लॉग इन आणि अ‍ॅप्सची लिंक करण्यासाठी आणखी एक सिक्युरिटी लेयर जोडला आहे. या नवीन बदलानंतर संगणकात व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट जोडण्यापूर्वी तुम्हाला फिंगरप्रिंट किंवा फेस आयडी विचारला जाईल. या नवीन सिक्युरिटी लेयरची भर पडल्यानंतर तुमच्या अनुपस्थितीत कोणीही तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटला संगणकाशी लिंक करू शकणार नाही. व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले आहे की फेस आणि फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन प्रक्रिया वापरकर्त्याच्या मोबाइल फोनवर होते आणि व्हॉट्सअ‍ॅप हँडसेटच्या ऑपरेटिंग सिस्टममधील स्टोअर बायोमेट्रिक माहितीमध्ये प्रवेश करू शकत नाही.

मोबाईल अ‍ॅपवर अतिरिक्त सिक्युरिटी लेयर जोडण्याचा उद्देश डेस्कटॉपवरील व्हॉट्सॲपचा चुकीचा वापर रोखणे असल्याचे कंपनीने जाहीर केले. व्हॉट्सअ‍ॅप वेब किंवा डेस्कटॉप अ‍ॅपमध्ये व्हॉट्सअ‍ॅप खात्याशी लिंक करण्यापूर्वी वापरकर्त्यांना त्यांच्या फोनवर फेस आयडी किंवा फिंगरप्रिंट अनलॉक वापरण्यास सांगितले जाईल. त्यानंतर डनवर क्लिक केल्यावर, वापरकर्त्यांना त्यांच्या फोनवरून क्यूआर कोडमध्ये प्रवेश करण्यात सक्षम होईल, जे डेस्कटॉप आणि संगणकात त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप खाते जोडण्याची प्रक्रिया पूर्ण करेल.

अ‍ॅॅॅपमध्ये म्हटले आहे की, ते बायोमेट्रिक माहिती संग्रहित करत नाही आणि डिझाइनद्वारे ते फोनच्या ऑपरेटिंग सिस्टममधील तपशीलांमध्ये प्रवेश करू शकत नाही. येत्या आठवड्यात नवीन सिक्युरिटी लेयर आणला जाईल, असे व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले आहे. येत्या आठवड्यात व्हॉट्सअ‍ॅप वेब पेजवर व्हिज्युअल रीडिझाइनदेखील देण्यात येणार आहे.

दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅॅॅप आपल्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीमुळे चर्चेत आहे, ज्यामध्ये ॲप वापरकर्त्यांना नवीन अटी स्वीकारण्यास भाग पाडत आहे. जे नवीन व्हॉट्सअ‍ॅप पॉलिसी स्वीकारत नाहीत, ते लोक 8 फेब्रुवारीपासून व्हॉट्सअ‍ॅप वापरु शकणार नाहीत. व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या निर्णयामुळे बराच संताप व्यक्त होत आहे, यामुळे लोक व्हॉट्सअ‍ॅप सोडून सिग्नल आणि टेलिग्राम यासारख्या इतर मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा अवलंब करण्यास सुरवात करत आहेत.