WhatsApp चे ‘Multi Device Feature’ लवकरच; कोट्यवधी युजर्संना होईल फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : जगभरात WhatsApp युजर्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कंपनीकडूनही युजर्ससाठी नवंनवे फिचर्स आणले जात आहे. असे असताना आता WhatsApp चे एक भन्नाट फिचर लवकरच लाँच होणार आहे. त्याचा फायदा कोट्यवधी युजर्संना होईल.

WhatsApp कडून असे एक फिचर्स लाँच केले जात आहे, या फिचरच्या माध्यमातून WhatsApp मध्ये मल्टि डिव्हाईस फिचर असणार आहे. सध्या आपण एका फोनमध्ये एकच WhatsApp वापरू शकतो. पण कंपनीच्या या नव्या फिचरच्या माध्यमातून युजर्सला एकाच मोबाईलमध्ये दोन WhatsApp वापरता येऊ शकतील. या फिचरबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होत्या. पण आता याची माहिती दिली जात आहे. सध्या जी काही माहिती दिली जात आहे, त्या माहितीनुसार, हे फिचर लवकरच iOS आणि Android साठी उपलब्ध केले जात आहे.

तसेच लेटेस्ट WhatsApp बीटा वर्जन 2.21.30 मध्ये युजरला लिंक्ड अकाउंट लॉग-आउट करण्याचा पर्याय मिळणार आहे. याबाबतची माहिती WaBetainfo कडून दिली जात आहे.

आणखी थोडी प्रतिक्षा

WaBetainfo नुसार, मल्टि डिव्हाईस फीचर WhatsApp आणि WhatsApp Business दोघांवर चांगला चालतो. त्यामुळे आता हे फिचर्स Android साठी लवकरच येऊ शकते. सध्या हे फिचर टेस्टिंग स्टेटवर आहे. त्यामुळे युजर्सला आणखी थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

एकाच स्मार्टफोनवर दोन WhatsApp चा सध्याही वापर

दरम्यान, एकाच स्मार्टफोनमध्ये दोन वेगवेगळ्या अकाउंटचे WhatsApp सुरु करण्याच्या पर्यायाचा वापर काही जण करत आहेत. मात्र, कंपनीकडून अधिकृत फिचर अद्याप लाँच केले नव्हते. पण आता हे फिचर लवकरच येणार आहे.