नवीन पॉलिसीचा WhatsApp ला मोठा झटका, 28 % युजर्स बंद करणार ॲप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नव्या पॉलिसीमुळे व्हॉट्सॲप युजर्समध्ये संभ्रम वाढला आहे. सायबर मीडिया रिसर्चनुसार 28 टक्के युजर्स आता व्हॉट्सॲपचा वापर बंद करण्याच्या विचारात आहेत. तर 79 टक्के युजर्स असे आहेत ज्यांनी अद्याप यासंदर्भात विचार केलेला नाही. व्हॉट्सॲप आपली नवीन प्रायव्हसी पॉलिसी 8 फेब्रुवारी 2021 पासून लागू करणार होते. मात्र, सध्या याला काही महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आले आहे.

युजर्समध्ये प्रचंड नाराजी
व्हॉट्सॲपची नवीन पॉलिसीमुळे युजर्समध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. 49 टक्के युजर्स यावरुन नाराज झाले आहेत. तसेच 45 टक्के युजर्सने व्हॉट्सॲपवर विश्वास ठेवला आहे. 35 टक्के युजर्सने ब्रीज ऑफ ट्रस्ट म्हणजेच विश्वास तोडल्याचं म्हटले आहे.

फिशिंग अटॅकचा धोका
सायबर मीडियाच्या रिसर्चमध्ये म्हटले आहे की, व्हॉट्सॲप आणि फेसबुक मेसेंजर पेक्षा जास्त युजर्स थर्ड पार्टी सर्वरवर स्टोर केले जात असल्याने चिंताग्रस्त आहेत. रिसर्च फर्मच्या माहितीनुसार, व्हॉट्सॲप आणि फेसबुक मेसेंजरच्या 50 टक्के हून जास्त युजर्सला जवळपास रोजच स्पॅम मेसेज येतात. तसेच सर्वेत भाग घेणाऱ्या युजर्समध्ये 50 टक्के अज्ञात नंबरवरुन संदिग्ध मेसेज मिळत होते. यात फिशिंग अटॅक वायरसचे लिंक होते.

टेलिग्राम आणि सिग्नलवर शिफ्ट होतायेत युजर
फिशिंग अटॅकसाठी व्हॉट्सॲप हॅकर्सचे पसंतीचे प्लॅटफॉर्म आहे. सर्वेच्या माहितीनुसार, व्हॉट्सॲपवर फिशिंग अटॅकची शक्यता 52 टक्के आहे. तर टेलिग्रामसाठी ही 28 टक्के आहे. रिपोर्टनुसार, सर्वेत भाग घेणाऱ्या युजर्समध्ये 41 टक्के टेलिग्राम आणि 35 टक्के युजर सिग्नलवर शिफ्ट होत आहेत.