आता WhatsApp द्वारे सुद्धा डाऊनलोड करू शकता PAN Card, Driving License, जाणून घ्या कसे
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – WhatsApp | सर्वसामान्यांच्या सोयी लक्षात घेऊन सरकारने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता कोणतीही व्यक्ती गरज पडल्यास Digilocker मध्ये सेव्ह केलेले, PAN Card, Driving License यासारखी महत्त्वाची कागदपत्रे WhatsApp द्वारे सहजपणे Access आणि डाउनलोड करू शकते. ही सुविधा सर्वसामान्यांसाठी अतिशय सोयीची ठरू शकते.
जाणून घ्या काय आहे उद्देश
सरकारी सेवा सुलभ, सर्वसमावेशक आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने सरकारने हा उप्रकम राबवला आहे. या उपक्रमांतर्गत, कोणीही नागरिक व्हॉट्सअपवर MyGov Helpdesk द्वारे डिजिलॉकरमध्ये जतन केलेले दस्तऐवज अॅक्सेस आणि डाउनलोड करू शकतो.
पीआयबीने ट्विट करून दिली माहिती
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) ने ट्विट केले आहे की, नागरिक आता पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र यांसारख्या कागदपत्रांमध्ये अॅक्सेस करू शकतात. लोक @mygovindia हेल्पडेस्कद्वारे व्हॉट्सअपवर Digilocker संबंधित सेवांमध्ये प्रवेश करू शकतात. (WhatsApp)
—
अशा प्रकारे मिळवू शकता ही सुविधा
WhatsApp वापरणारे लोक +91 9013151515 या क्रमांकावर ’Namaste किंवा Hi किंवा डिजिलॉकर’ पाठवू शकतात. यानंतर ते डिजिलॉकरच्या सेवा वापरू शकतील.
याद्वारे, डिजिलॉकर खाते सेटअप किंवा सत्यापित केले जाऊ शकते. एवढेच नाही तर WhatsApp वर पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र यांसारखी कागदपत्रे डाउनलोड करता येतील.
डिजिलॉकर बद्दल जाणून घ्या
डिजिलॉकर हे विविध कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे इश्यू करण्यासाठी आणि व्हेरिफाय करण्यासाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. यामुळे फिजिकल डॉक्युमेंट्सची गरज नाहीशी होते. पीआयबीच्या मते, नवीन सेवा अंतर्गत, रहिवासी खालील दस्तऐवजांमध्ये सहज अॅक्सेस करू शकतात :
1. पॅन कार्ड (PAN card)
2. ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License)
3. CBSE Class X Passing Certificate
4. वाहन नोंदणी प्रमाणपत्र (RC)
5. विमा पॉलिसी – दुचाकी
6. दहावीची मार्कशीट (Class X Marksheet)
7. बारावीची मार्कशीट
8. विमा पॉलिसी दस्तऐवज (डिजिलॉकरवर उपलब्ध लाइफ आणि नॉन-लाइफ इन्शुरन्स)
Web Title :- Whatsapp | whatsapp digilocker feature pan card and drivers license can be accessed through whatsapp
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update