BJP ला 750 कोटी देणगी देणारे ‘ते’ कोण ? उद्योगपतींच्या चाव्या भाजपच्या व्यापारी मंडळाकडे ? जाणून घ्या सविस्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – परदेशातील काळ्या पैशांचा (black money) खरा आकडा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे (PM Narendra Modi) BJP होता. हा हजारो कोटींचा काळा पैसा परत आणू व देशाची भ्रष्ट अर्थव्यवस्था स्वच्छ (clean up the corrupt economy of the country) करू, असे मोदींचे वचन (Promise) होते म्हणून लोकांनी मतदान (People vote) केले. तो काळा पैसा कधी आलाच नाही. तो काळा पैसा निवडणुकीत (Election) वाहतोच आहे. गंगेत प्रेते तरंगत आहेत (Corpses floating in the Ganges river). निवडणुकांत काळा पैसा वाहतो आहे. राजकारणात पैसाच बोलतो आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

निवडणुका हीच भ्रष्टाचाराची ‘गंगोत्री’
उद्योगपती, बिल्डर्स, ठेकेदार, व्यापारी (Industrialists, builders, contractors, merchants) मंडळी कोट्यवधीच्या देणग्या (Donation) एखाद्या राजकीय पक्षास (Political party) देतात ते काय फक्त धर्मादाय (Charity) म्हणून ? या देणग्यांची वसुली (Recovery) पुढच्या काळात व्यवस्थित होतच असते.
निवडणुका हीच भ्रष्टाचाराची गंगोत्री (Gangotri of corruption) आहे.
काळ्या पैशांचा धबधबा तेथेच वाहत आहे.
लोकशाही भ्रष्ट (Democracy corrupt) आहे म्हणून राज्य व्यवस्था भ्रष्ट (state system is corrupt) होते.
सामना (Samana) अग्रलेखातून शिवसेनेने (Shivsena) भाजपावर (BJP) अशा शब्दात हल्लाबोल केला.

14 शिक्षण संस्थांनी भाजपच्या दानपेटीत कोट्यावधी रुपये टाकले
आयटीसी ग्रुपने (ITC Group) 76 कोटी, जनकल्याण ट्रस्टने 45.95 कोटी, शिवाय महाराष्ट्रातील बी.जी. शिर्के कन्स्ट्रक्शनचे B.G. Shirke Construction 35 कोटी, लोढा डेव्हलपर्सचे (Lodha Developers) 21 कोटी, गुलमण डेव्हलपर्सचे 20 कोटी, जुपिटर कॅपिटलचे 15 कोटी असे मोठे आकडे आहेत.
तसेच भाजपला 2019-20 मध्ये जे भव्य देणगीदार लाभले आहेत ते कोण आहेत ?
त्यात अंबानी, अदानी, मित्तल, टाटा, बिर्ला (Ambani, Adani, Mittal, Tata, Birla) ही हमखास नावे नाहीत.
सगळ्यात मोठे दानशूर फुडेंट इलेक्टोरल ट्रस्ट (Fudent Electoral Trust) असून त्यांनी 217.75 कोटी रुपये भाजपला दान दिले आहेत.
देशातील 14 शिक्षण संस्थांनी (Educational institution) भाजपच्या दानपेटीत कोट्यावधी रुपये टाकले आहेत असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

महाविकास आघाडीत फूट ? प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची भूमिका हीच पक्षाची भूमिका, काँग्रेस स्वबळावर लढणार

सामना अग्रलेखातून या मुद्यांवर टाकला प्रकाश
2014 आणि 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत (General election) पैशांचा अफाट व अचाट वापर करण्यात आला.
पैशांची ने-आण करण्यासाठी विमाने व हेलिकॉप्टरचा (Planes and helicopters) वापर झाला.
तो सर्व कारभार पाहता 750 कोटीच्या देणग्या म्हणजे झाडावरून गळून पडलेली सुकलेली पानेच म्हणावी लागतील.
भारतीय जनता पक्ष (BJP) सत्तेवर आहे व उद्योगपतींच्या चाव्या भाजपच्या व्यापारी मंडळाकडे आहेत.

राजकारण हा फक्त पैशांचा खेळ
सध्याचे राजकारण हा फक्त पैशांचा खेळ झाला आहे.
तिरुपती, शिर्डी (Tirupati, Shirdi) ही सध्याच्या काळातील श्रीमंत देवस्थाने (Rich temples) आहेत. तत्त्व, विचार, राष्ट्र या संकल्पना मागे पडल्या आहेत.
पैसा फेको तमाशा देखो हा नवा खेळ गेल्या काही वर्षांपासून सुरू झाला आहे.

भगवी शॉल अन् गुपचूप अंकाई किल्ल्यावर २ दिवस मुक्काम, महादेव जाणकरांचा VIDEO समोर

उमेदवारास विचारला जातो, खर्च करण्याची ताकद किती ?
तुझी जात कोणती हा पहिला प्रश्न उमेदवारास विचारला जातो. खर्च करण्याची ताकद किती? हा दुसरा प्रश्न.
त्यामुळे जात आणि पैसा या दोन प्रमुख गोष्टी सध्या निवडणुकीच्या राजकारणात जोरात आहेत.
उमेदवार मालामाल असावे लागतात, तसे राजकीय पक्षही आपापल्या परीने मालामाल होत असतात.
हा हिशोब सांगण्याचे कारण असे की, ताज्या बातमीनुसार फक्त एका वर्षात भारतीय जनता पक्षाला (BJP) 750 कोटी रुपयांच्या भरघोस देणग्या मिळाल्या आहेत.
हा अधिकृत देणगीदारांचा आकडा आहे. बाकी टेबलाखालचे वेगळे! या गलेलठ्ठ देणग्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून (Corporate company) तसेच व्यक्तिगत (Personal) स्वरूपातही मिळाल्या आहेत.

निवडणुका हेच युद्ध
इतिहास काळात निवडणुकांचे राजकारण नव्हते, पण ‘युद्ध’ लढण्यासाठी मोठय़ा रकमा लागत, त्याची व्यवस्था ‘सावकार’ मंडळी करीत किंवा ‘सुरत’सारखी लूट करून युद्धाचा खर्च भागवला जाई.
आज निवडणुका हेच युद्ध बनल्याने (Elections are a war) त्या युद्धासाठी हजारो कोटी रुपये गोळा केले जातात.

750 कोटीवाल्या भाजपचा सहज पराभव
सर्वच पक्ष आपापल्या कुवतीप्रमाणे ही उलाढाल करीत असतात.
पैसा हाच राजकारणाचा आत्मा बनला आहे. देशाच्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीची ही शोकांतिका आहे हे मान्य, पण हा पैशांचा खेळ यशस्वी होतो असेही नाही.
श्रीमंत भारतीय जनता पक्षाला (BJP) प. बंगालची निवडणूक (West Bengal election) जिंकता आली नाही व 8 कोटी रुपये देणगीदाखल मिळालेल्या तृणमूल काँग्रेसने 750 कोटीवाल्या भाजपचा सहज पराभव केला.

तरीही लोकांचा पाठिंबा शिवसेनेला
महाराष्ट्रातील शिवसेनेचे (Maharashtra Shivsena) नाव श्रीमंतांच्या यादीत नाही व मोठ्या देणग्या शिवसेनेस मिळाल्याचे दिसत नाही, तरीही लोकांचा पाठिंबा या एकमेव श्रीमंतीवर शिवसेना गेल्या पन्नास वर्षांपासून मैदानात लढतेच आहे.
कोट्यावधी रुपयांचा चुराडा करूनही अनेकांचा पराभव होतो तर अनेक ‘फाटके’ उमेदवार पैशांचा गाजावाजा न करता श्रीमंतीचा पराभव करून विजयी झालेच आहेत.

sushant singh rajput death anniversary | सुशांत सिंह आत्महत्या की हत्या? एक वर्षानंतरही गुढ कायम; सीबीआयला छडा लावण्यात अपयश

राष्ट्रवादी हा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष
तृणमूल काँग्रेसला (Trinamool Congress) 8 कोटी रुपये, सीपीएमला (CPM) 19.6 कोटी आणि सी.पी.आय.ला 1.9 कोटी रुपये देणगीरूपाने मिळाले असल्याचे अधिकृत आकडे समोर आले आहेत.
2019-20 या एका वर्षातला हा अत्यंत किरकोळ हिशोब आहे.
या काळात सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या राष्ट्रीय काँग्रेसला (National Congress) 139 कोटी रुपये देणगीदाखल मिळाले.
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) हा तिसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत पक्ष (Rich party) दिसतोय. त्यांना 59 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या.
भारतीय जनता पक्षाची श्रीमंती डोळ्यात खुपते असे म्हणणे चुकीचे आहे.
श्रीमंती डोळ्यात भरते असेच म्हणावे लागेल.

प्रत्यक्ष निधी जास्त
भारतीय जनता पक्षाचा (BJP) 750 कोटी हा आकडा प्रत्यक्षात अधिक मोठा असू शकेल, कारण निवडणूक आयोगास (Election Commission) सादर केलेल्या अहवालात 20 हजारांपेक्षा जास्त रकमा देणाऱ्यांचीच नावे सादर केली जातात.
त्यामुळे 20 हजारवाले कोट्यावधी लोक असू शकतात. त्यांच्या दानपेटीत ‘गुप्त’ धन अशाप्रकारे पडत असते की एका रात्रीत आपले देव श्रीमंत होतात.
त्या खालोखाल राजकीय पक्षांना ‘दान’ दिले जाते. राजकारणात पैशांचा धूर निघणे हे आता नेहमीचेच झाले आहे.
सत्ता आणि पैसा (Power and money) ही एक वेगळी नशा आहे.
पैशांतून सत्ता, सत्तेतून पुन्हा पैसा. त्याच पैशांतून पुनः पुन्हा सत्ता. हे दुष्टचक्र भेदणे आपल्या लोकशाहीत आता कुणालाही शक्य होईल असे वाटत नाही.

राज्यव्यवस्थेत सावकारांची व्यवस्था
राजकारणात किंवा प्रत्येक राज्यव्यवस्थेत सावकारांची व्यवस्था व महत्त्व इतिहास काळापासून आजपर्यंत आहे.
उद्योगपतींसाठी कायदे (Laws) बदलले जातात, नियम (Rules) वाकवले जातात व त्याने दिलेल्या देणग्यांची पुरेपूर वसुली त्यास करता येईल याचा चोख बंदोबस्त केला जातो.
देणग्या द्या, सत्तेवर येताच दामदुपटीने ‘वसूल’ करण्याची मुभा देऊ, असे सांगितले जाते.

Web Title : who donate rs 750 crore to bjp shiv sena targeted

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ST महामंडळ आता सुरु करणार पार्सल अन् कुरीअर सेवा, उत्पन्न वाढीसाठी घेतला निर्णय; वार्षिक 500 कोटींच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट

आता ‘पाकिस्तान क्रिकेट लीग’वरही ‘सट्टा’; सट्टेबाजी करणार्‍या 4 जणांना पोलिसांनी केली अटक