आता जगभरात दिली जाणार Serum Institute ची कोरोना व्हॅक्सीन, WHO ने दिली आत्कालीन वापराची मंजूरी

जिनिव्हा : भारतात सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाद्वारे तयार होणारी कोरोना व्हॅक्सीन कोविशील्डचा वापर आता जगभरात होईल. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ऑक्सफोर्ड आणि एस्ट्राजेनेकाद्वारे विकसित केलेल्या दोन कोविड-19 व्हॅक्सीनला आपत्कालीन वापरासाठी मंजूरी दिली आहे. यामध्ये सीरम इन्स्टीट्यूटची व्हॅक्सीन दक्षिण कोरियाच्या एस्ट्राजेनेका-एसकेबायोची व्हॅक्सीन आहे.

व्हॅक्सीन उत्पादनाचा वेग वाढावा : डब्ल्यूएचओ
डब्ल्यूएचओने सोमवारी जारी वक्तव्यात सांगितले की, ऑक्सफोर्ड-एस्ट्रेजेनेकाच्या व्हॅक्सीनच्या दोन प्रकारांना आपत्कालीन वापरासाठी मंजूरी देण्यात आली आहे जेणेकरून जगभरात कोवॅक्स अंतर्गत लसीकरण वाढवता येऊ शकते. यासोबतच डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस एडहानॉम म्हणाले की, आपल्याला व्हॅक्सीनच्या उत्पादनाचा सुद्धा वेग वाढवला पाहिजे.

यूएनच्या आरोग्य एजन्सीची शिफारास
व्हॅक्सीनला मंजूरी देण्याच्या बरोबर एक दिवस अगोदर यूएनच्या आरोग्य एजन्सीच्या एका पॅनलने व्हॅक्सीनबाबत अंतरिम सिफारस दिली होती, ज्यामध्ये म्हटले होते की, सर्व ज्येष्ठांना 8-12 आठवड्यांच्या अंतराने व्हॅक्सीनचे दोन डोस दिले पाहिजेत.

फायजरच्या व्हॅक्सीनला मिळाली मंजूरी
डब्ल्यूएचओने मागील वर्षी डिसेंबरमध्ये फायजरच्या कोरोना व्हॅक्सीनला आपत्कालीन वापराची मंजूरी दिली होती. ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाची कोरोना व्हॅक्सीन फायजरच्या व्हॅक्सीनच्या तुलनेत खुप स्वस्त आहे.

गरीब देशांना उपलब्ध केली जाईल व्हॅक्सीन
डब्ल्यूएचओने आपल्या वक्तव्यात म्हटले, ऑक्सफोर्ड-एस्ट्रेजेनेकाच्या या दोन कोरोना व्हॅक्सीनला मंजूरी दिली गेल्यानंतर जगभरातील अनेक देशांमध्ये कोव्हॅक्स प्रोग्राम अंतर्गत लस देण्याच्या कामाला वेग येईल. यानंतर जगातील ज्या देशांमध्ये अजूनपर्यंत व्हॅक्सीन मिळत नव्हती, तिथे आता कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात केली जाऊ शकते.