विठ्ठल मंदिराचे पुरातत्व कोण जपणार?

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन

अकराव्या शतकापूर्वीपासून अस्तित्वात असलेले पंढरपूरचे विठ्ठल मंदिर आमच्या अखत्यारित नाही, असे पत्र पुरातत्व विभागाने दिल्याने नवीन प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या तसेच दक्षिण काशी  म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या मंदिराचे पुरातत्व कोण जपणार? हा पेच निर्माण झाला आहे.

विठ्ठल मंदिर एक हजार वर्षे जुने आहे. आणखी हजार वर्षे मंदिराचे जुने स्वरूप टिकविण्याची पुरातत्व विभागाची भूमिका होती. त्यासाठी आहे त्या स्वरूपातच मंदिराची डागडुज्जी करावी, अशा सूचना पुरातत्व खात्याने मंदिर समितीला पाच वर्षापूर्वी दिल्या होत्या. मात्र, समितीने या सूचनांवर आक्षेप घेत हे मंदिर पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत नसतानाही त्यांच्याकडून सूचनांचा अतिरेक होत असल्याचा आरोप केला होता.विठ्ठल मूर्तीच्या लेपनासह मंदिरातील सर्व दुरुस्ती पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानुसारच आतापर्यंत करण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’436826a3-bbf9-11e8-a8fc-c5cca9b1aed2′]

पुरातत्व विभागाने एक पत्र पाठवले असून पंढरपूरचे विठ्ठल मंदिर आमच्या अखत्यारित नसल्याचे म्हटले आहे. आता मात्र पुरातत्व विभागाने हात झटकल्याने  दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मंदिराचे पुरातत्व कोण जपणार ,असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुरातत्व विभागाच्या या निर्णयावर वारकरी सांप्रदाय काय भुमिका घेतात हे पाहणे उचित ठरणार आहे.

[amazon_link asins=’B01F7AX9ZA,B07BCGC13F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c18ed9eb-bbfb-11e8-aff7-e38f4bd7d14e’]