‘इतकी गचाळ का राहतेस?’, हेमांगी कवी आली पुन्हा एकदा ट्रोलिंग च्या घेऱ्यात

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  हेमांगी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंट अनेक व्हिडीओ शेअर करत असते. मात्र नुकतचं तिच्या फोटोवरून एका माहिलेने हेमांगीला ट्रोल केलं आहे. महिलेच्या कमेटंला हेमांगीने देखील सडेतोड शब्दात उत्तर दिलं. हेमांगीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. मेकअप न करता तिने हा व्हीडीओ शेअर केला. या व्हीडीओवर एका महिलेने कमेंट केली कि, “एक्सप्रेशन आणि डान्स वैगरे ठिक आहे पण एवढी गचाळ का राहतेस ? जरा टापटीप रहा म्हणजे आम्हाला बघवेल व्हीडीओ प्लिज.”

हेमांगीने फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत या ट्रोल करणाऱ्या महिलेला सडेतोड उत्तर दिलं व यात हेमांगी म्हणाली, “या फोटोतली कमेंट वाचा ! ही एका स्त्री ने लिहिली आहे! शिकलेली, बऱ्या घरातली बाई! नक्की कुठे चाललोय आपण? आता कमेंटसचा भडीमार होणार, दूर्लक्ष कर सोशल मीडिया आहे. लोक बोलणारच वगैरे वगैरे! मला एवढंच लक्षात आणून द्यायचंय की आपली मानसिकता काय होत चालली आहे. ती जर चूक असले तर ती थांबवावी की नाही हे ज्याने त्याने ठरवावे!” असं हेमांगीने फेसबुक पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हंटलं आहे.