लहान वयातच चष्मा लागलाय ? कशी घ्यावी मुलांची काळजी ? जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन – सध्याच्या बदलत्या काळात अनेक लहान मुलांना चष्मा ( glasses)  लागला आहे. सतत टीव्ही, व्हिडीओ गेम, लॅपटॉप यांचा वापर केल्यानं डोळ्यांवर ताण येतो आणि यामुळं डोळ्यांच्या समस्या निर्माण होतात. म्हणून लहान मुलांच्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी काही उपाय आणि काही चांगल्या सवयी लावण्याची गरज आहे. नेमकी काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

1) स्मार्ट फोन, टीव्ही आणि इतर गॅजेट्स वापरण्याच्या वेळा मर्यादित कराव्यात.

2) डिजिटल अभ्यासाव्यतिरीक्त मुलं फार वेळ गेमिंग किंवा सर्चिंग करणार नाहीत याकडे लक्ष द्यावं.

3) मुलांना पुरेशी झोप मिळेल याकडे लक्ष द्या.

4) आहारात व्हिटॅमिन सी आणि ई, झिंक, ल्युटीन, झेक्सॅन्थेन आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड यांची मात्र असलेले पदार्थ, फळे, भाज्या द्या.

5) 5 ते 17 वयोगटातील मुलांच्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट वापरावर मर्यादा आणणं गरजेचं आहे. यामुळं फायदा मिळेल.

6) हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश असावा.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.