Video : सावधान ! थंडीत वाढतो ‘चिल ब्लेन’चा धोका, जाणून घ्या लक्षणे आणि उपाय….

पोलीसनामा ऑनलाइन टीम – थंडीच्या दिवसांत सर्दी, खोकला होणे हे अगदी सामान्य आहे. वातावरणातील कमी झालेल्या तापमानाचा शरीरावर परिणाम होतो आणि सर्दी, खोकला असे आजार होतात. पण त्यासोबतच आता आणखी एक समस्या होण्याचा धोका निर्माण झाला आहे तो म्हणजे ‘चिल ब्लेन’. पण हा काही नवीन आजार नाही, हिवाळ्यात अनेकांना ही समस्या होते. विशेष करून ज्या महिलांना हिवाळ्यात जास्त बाहेर काम करावे लागते, अशांना ही समस्या होऊ शकते. याबाबत Ministry of Jal Shakti, Department of Water Resources, RD & GR या आजारासंबंधी एक व्हिडीओ जारी केला आहे.

 

चिल ब्लेनची लक्षणे
या आजारात लोकांच्या हात आणि पायांची बोटे, कानाच्या खालचा भाग लाल होऊन सुजतो. यावर खाज, गरमी आणि जळजळही होते. अनेकदा तर लोक खाजवण्याच्या नादात जखमाही करून घेतात. याने स्किन कॅन्सरचा धोका होतो.

काय आहे याच कारण ?
ज्या लोकांची त्वचा अधिक संवेदनशील असते त्यांना फार जास्त थंडीनंतर जेव्हा अचानक गरमी मिळते किंवा गरमीतून अचानक थंडीत जातात अशांना चिल ब्लेनची समस्या होऊ शकते. ही समस्या सर्वात जास्त डिसेंबर महिन्याच्या शेवटी आणि जानेवारीच्या सुरूवातीला बघायला मिळते. कारण यादरम्यान थंडी खूप जास्त पडते.

काय करावे – काय करू नये ?
जर चिल ब्लेनची लक्षणे तुमच्यात दिसत असतील म्हणजे खूप खाजवत असेल तर नखांनी खाजवण्याऐवजी कापडाने आरामात खाजवा. चिल ब्लेन ही समस्या झाल्यावर शरीराचा तो भाग आगीसमोर बसून गरम करू नका. याने समस्या अधिक वाढते. यापासून सूटका मिळवण्यासाठी गरम पाण्यात थोडं मिठ टाका आणि त्याने हात-पाय शेका. जास्त समस्या असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधावा.