Winter Session 2022 | ‘गायरान’ जमीन घोटाळा प्रकरणात विरोधकांचे पुढचे पाऊल; सत्तारांनंतर ‘या’ मंत्र्यावरही केले घोटाळ्याचे आरोप…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन | राज्याचे हिवाळी (Winter Session 2022) अधिवेशन हे सध्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून चांगलेच तापले आहे. सोमवारी गायरान घोटाळा प्रकरणात विरोधकांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी करत दोन्ही सभागृहांचे कामकाज बंद पाडले. त्यानंतर आता या गायरान जमीन घोटाळा प्रकरणात तत्कालिन महसुल राज्यमंत्री राहिलेले संजय राठोड यांचे नाव विरोधकांनी घेतले आहे. त्यांच्यावर गायराण जमीन खासगी विकासकाला दिल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. (Winter Session 2022)

राज्यमंत्री असताना २९ जुलै २०१९ रोजी संजय राठोडांनी काढलेल्या एका शासकीय आदेशाचा हवाला देत हा घोटाळा झाला आहे असा आरोप संजय राठोडांवर करण्यात आला आहे. (Winter Session 2022) अगोदरच या प्रकरणात अब्दुल सत्तार यांच्या समावेशावरून अडचणीत सापडलेल्या सरकारच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे.

याअगोदर विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नागपुर सुधार प्रन्यास भूखंड घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्र्यांना लक्ष केले होते. आणि आता शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार व संजय राठोड यांच्यावर गायरान घोटाळा प्रकरणी विरोधकांनी आरोप केले आहेत. राज्यमंत्री असताना संजय राठोडांनी वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर तालुक्यातील सावरगाव येथील एका व्यक्तीस २९ जुलै २०१९ मध्ये गायरानाची पाच एकर जमीन एका खासगी व्यक्तीला देण्याचे आदेश काढले होते. यावर उच्च आणि सर्वोच्च न्यायालय वेळोवेळी आदेश देत आहेत की अशा गायरान जमिनी देण्यात येऊ नयेत. तरीदेखील आपल्या पदाचा गैरवापर करत संजय राठोडांनी बेकायदेशीररित्या आदेश काढल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला आहे.

ही जमिन गेली अनेक वर्षे आपल्या ताब्यात असून ती आपल्या नावावर करण्यात यावी अशी मागणी शांताबाई जाधव नामक महिलेने तहसिलदार तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. मात्र अशा प्रकारच्या शासकीय ई क्लास गायराण जमिनीवरील अतिक्रमण नियमीत करण्याची कोणतीही तरतूद नियमात नसल्याने आणि उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाने त्याबाबतचे निर्णय वेळोवेळी दिले असल्याचे नमुद करत तत्कालिन जिल्हाधिकारी वाशिम यांनी व मंगळूरपीर तहसिलदार यांनी ही जमिन खासगी व्यक्तीला देता येणार नाही असे आदेश काढले होते. तसेच या प्रकरणी आलेला शांताबाई जाधव यांचा अर्ज देखील फेटाळण्यात आला होता. (Winter Session 2022)

मात्र संजय राठोड हे महसुल राज्यमंत्री असताना त्यांच्यासमोर हे प्रकरण सुनावणीसाठी आले असता
त्यांनी जिल्हाधिकारी वाशिम यांचा १७ मे २०१८ रोजी दिलेला आदेश रद्द ठरवत संबंधित पाच एकर जागा
नियमानुकूल करण्यात यावी असे आदेश तत्कालिन जिल्हाधिकारी वाशिम यांना दिले.
तसेच या प्रकरणी आधीचे आदेश देताना जिल्हाधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती तपासली नाही असा अभिप्राय देखील
संजय राठोडांनी दिला होता. तसेच ही जमिन १९७५ पासून अतिक्रमणित असल्याने नियमीत करण्यात पात्र
असल्याचे मत देखील त्यांनी नोंदविले होते. (Winter Session 2022) माहितीच्या अधिकारात ही माहिती
समोर आली असून याप्रकरणी संजय राठोडांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Web Title :- Winter Session 2022 | maharashtra assembly winter session 2022 sanjay rathod grazing gairan land scam

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

EPFO Alert | ६ कोटीपेक्षा जास्त लोकांना दिली महत्वाची माहिती, अजिबात करू नका हे काम

Devendra Fadnavis | पुणे शहरातील पर्वती आणि पद्मावती विभागात ग्राहकांना सदोष वीज देयके, देवेंद्र फडणवीसांची कबुली; अभियंत्यांवर कारवाई सुरु