संधीवात, सांधेदुखीच्या वेदनांपासून सुटका करतील मेथीचे लाडू, ‘ही’ आहे बनवण्याची पद्धत

नवी दिल्ली : हिवाळ्यात नेहमी लोक आळस, कंबरदुखी, संधीवात आणि सांधेदुखीची तक्रार करतात. तुम्ही सुद्धा अशा समस्येने त्रस्त असाल तर हिवाळ्यात सकाळी नाश्त्यात मेथीचे लाडू सेवन केल्याने या समस्यांपासून सुटका होऊ शकते. हे लाडू शरीरात उत्साह निर्माण करण्यासह कंबरदुखी, संधीवात, वात रोग, दुखणे दूर करतात. हे लाडू बनवण्याची कृती आणि साहित्य जाणून घेवूयात.

मेथीचे लाडू बनवण्याचे साहित्य –
-500 ग्रॅम मेथीदाणे
-100 ग्रॅम खाण्याचा गोंद
– 500 ग्रॅम जाड दळलेले गव्हाचे पीठ
-1 किलो गुळ
– 250 ग्रॅम पीठी साखर
– 10 ग्रॅम सुंठ पावडर
-1 किलो शुद्ध तूप
– 100 ग्रॅम खसखस
– 250 ग्रॅम कापलेला सुकामेवा
-10 ग्रॅम वेलची पावडर

कृती –
प्रथम मेथीदाणे स्वच्छ करून दोन दिवस पाणी बदलून भिजवा. नंतर मेथीदाणे ताज्या पाण्यात धुवून वाटून घ्या. मोठ्या तळण्याच्या भांड्यात एक मोठा चमचा तूप टाकून मंद आचेवर भाजन घ्या. हळुहळु हलवत भाजत राहा. ब्राऊन झाल्यानंतर आणि सुवास येऊ लागल्यावर खाली उतरवा. पीठ चाळून घेऊन तूपासोबत वेगळे अशाच प्रकारे भाजून घ्या. आता गोंद तुपात टाकून हलका भाजून बारीक करा.

कमी गरम तूपात सूंठ पावडर आणि खसखस टाकून काढा. गुळ बारीक करून तुपात परतवा. जेव्हा गुळ तुपात व्यवस्थित विरघळून मिसळेल तेव्हा खाली उतरवून यामध्ये तयार केलेले सर्व साहित्य कापलेला सुकामेवा, वेलची पावडर आणि अर्धी पीठी साखर टाका. तूप कमी वाटले तर आवश्यकतेनुसार गरम तूप मिसळा. आता थोडे गरम असतानाच लाडू बांधायला घ्या.