विप्रोचे चीफ एक्झीक्यूटिव्ह आहेत देशातील सर्वात महागडे अधिकारी, इतकी आहे त्यांची सॅलरी

नवी दिल्ली : वृत्त संस्था – विप्रो (WIPRO) चे चीफ एक्झीक्यूटिव्ह थिएरी डेलापोर्टे यांना मागील महिन्यात वेतन भत्ता म्हणून 8.8 मिलियन डॉलर दिले गेले होते. डेलापोर्टे यांना देण्यात आलेल्या पैशात 1.3 मिलियन डॉलर पगार आणि अलाऊन्सेस म्हणून 1.5 मिलियन डॉलर, 5.2 मिलियन डॉलर इतर उत्पन्नाच्या रूपात तसेच 760,000 लाँग टर्म कॉम्पेनसेशन म्हणून देण्यात आले आहेत. अशाप्रकारे भारतीय कंपनीद्वारे हायर करण्यात आलेल्या परदेशी अधिकार्‍यांमध्ये थिएरी डेलापोर्टे सर्वात जास्त सॅलरी मिळवणारे अधिकारी बनले आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

त्यांना हे भत्ते 6 जुलैपासून 31 मार्चपर्यंत दरम्यान दिले गेले होते.
त्यांचे पूर्वाधिकारी अबिदाली नीमचवाला यांना 2019-20 मध्ये 4.4 मिलियन डॉलर रुपये दिले गेले.
विप्रोमध्ये येण्यापूर्वी डेलापोर्टे कॅपजेमिनीमध्ये चीफ ऑपरेटिंग ऑफिसरच्या पदावर काम करत होते.
तिथे त्यांना 2019 मध्ये 4.9 मिलियन डॉलर वेतन भत्त्यांच्या रूपात दिले गेले. यामध्ये 1.9 मिलियन डॉलरचे फिक्स्ड तसेच इतर प्रकारच्या शेयर्सचा सुद्धा समावेश होता.

अजीम प्रेमजी यांचे पूत्र तसेच विप्रोचे चेयरमेन रिषद प्रेमजी यांना सुद्धा मागील वर्षी 1.6 मिलियन डॉलरचे वेतन भत्ते दिले गेले जे त्यांच्याद्वारे 2019 मध्ये प्राप्त केलेल्या भत्त्यांच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहेत. त्यांना सुमारे आठ लाख डॉलर सॅलरी आणि भत्त्यांच्या रूपात, 7 लाख 60 हजार डॉलर कमीशनच्या रूपात, इतर भत्त्यांच्या रूपात 2,334 डॉलर तसेच लाँग टर्म कॉम्पेनसेशनच्या रूपात 52,791 डॉलर दिले गेले. यासोबतच त्यांना 2021 मध्ये विप्रो लिमिटेडच्या एकुण प्रॉफिटमध्ये सुद्धा 0.35 टक्के कमिशन दिले गेले.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : Pune News | ‘I like you so much’! molestation case Accuse sentenced to 6 months hard labor

हे देखील वाचा

Sambhajiraje Meets Uadayanraje | उदयनराजेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल, राजे म्हणाले – ‘संभाजी राजेंच्या आंदोलनाला माझा पाठिंबा’ (Video)

Pune News | काँग्रेसच्या छत्री मोफत दुरुस्ती उपक्रमास प्रारंभ; उपक्रम सामाजिक जाणीव व्यक्त करणारा – किरण मोघे

दुर्देवी ! राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात मृत्यू, कुटुंबीय करणार ‘हे’ मोठं काम