देशातील तिसरी सर्वात मोठी IT कंपनी WIPRO ने रचला इतिहास, गुंतवणुकदारांना केले एका वर्षात ‘मालामाल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Wipro | देशाची दिग्गज आयटी कंपनी विप्रो (Wipro) ने इतिहास रचत मार्केट कॅप (market cap) चार लाख कोटीवर नेले आहे. आज व्यवहाराच्या सत्रात कंपनीचा शेयर 700 रुपयांच्या पुढे जाताच कंपनीचे मार्केट कॅपसुद्धा 4 लाख कोटी रुपये झाले. चार लाख कोटीच्या मार्केट कॅपवाली विप्रो देशाची तिसरी म्हणजे टीसीएस आणि इन्फोसिस (TCS and Infosys) नंतर सर्वात मोठी कंपनी आहे.

आज कंपनीच्या शेयरमध्ये सुमारे 6 टक्के तेजी पहायला मिळली आणि 5 टक्केच्या तेजीसह व्यवहार बंद झाला आहे.
विप्रोने एका वर्षात गुंतवणुकदारांचे पैसे दुप्पटीपेक्षा जास्त केले आहेत.

विप्रोच्या शेयरमध्ये 6 टक्के तेजी

आज विप्रोच्या (Wipro) शेयरमध्ये 6 टक्के तेजी पहायला मिळाली आणि कंपनीचा शेयर 739.80 रुपयांसह सर्वोच्च स्तरावर गेला.
तर कंपनीचा शेयर 5.20 टक्केच्या तेजीसह 707.55 रुपयांवर बंद झाला.

आज कंपनीच्या शेयरची सुरुवात तेजीसह 698 रुपयांसोबत झाली होती. एक दिवसापूर्वी कंपनीचा शेयर 672.55 रुपयांवर बंद झाला होता.
मागील तीन दिवसात कंपनीचा शेयर 13 टक्केपेक्षा जास्त वाढला आहे.

मार्केट कॅप 4 लाख कोटी रुपयांच्या पुढे

कंपनीचा शेयर आज 739.55 रुपयांवर पोहचताच कंपनीचे मार्केट कॅप 4,05,471 कोटी रुपयांवर आले.
तर बाजार बंद होईपर्यंत कंपनीचे मार्केट कॅप 3,87,795.36 कोटी रुपयांवर राहिले आहे.

मागील तीन दिवसात कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 48000 कोटी रुपयांची तेजी पहायला मिळाली.
सोमवारी जेव्हा बाजार बंद झाला तेव्हा कंपनीचे मार्केट कॅप 357596.05 कोटी रुपयांवर होते.

 

एका वर्षात दिला दुप्पटीपेक्षा जास्त पैसा

एका वर्षात गुंतवणुकदारांचा पैसा विप्रोच्या शेयरने दुप्पटीपेक्षा जास्त केला आहे.
मागील वर्षी ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यात विप्रो शेयर प्राईस 331.15 रुपयांवर होती, जी आज 739.80 रुपये झाली.
म्हणजे या दरमयान कंपनीच्या शेयरमध्ये 123.40 टक्के तेजी पहायला मिळाली.

जर एखाद्याने एक वर्षापूर्वी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याचे मूल्य आज 2.23 लाख रुपये झाले असते.
याचा अर्थ विप्रोमध्ये (Wipro) गुंतवणूक करणार्‍याचा पैसा एक वर्षात दुप्पटीपेक्षा जास्त झाला.

देशातील 13वी कंपनी बनली

विप्रो देशाची 13 वी अशी कंपनी आहे, जिचे मार्केट कॅप 4 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. त्यापूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचडीएफसी बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, इन्फोसिस, एचडीएफसी लिमिटेड, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, आयटीसी, कोटक महिंद्रा बँक, भारती एयरटेल लिमिटेड (Reliance Industries Limited, Tata Consultancy Services, HDFC Bank, Hindustan Unilever Limited, Infosys, HDFC Limited, ICICI Bank, Bajaj Finance, ITC, Kotak Mahindra Bank and Bharti Airtel Limited) सह केवळ 12 भारतीय लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 4 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title : Wipro | countrys third largest it company wipro created history made investors rich in one year

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | पुण्यातील गणपती विसर्जनाच्या मिरवणूकीला अडथळा ठरणारा लकडी पूलावरील मेट्रो पूलाबाबत मध्यम मार्ग काढणारच – आबा बागूल

Post Office Schemes | दररोज 150 रुपयांच्या सेव्हिंगने बनवू शकता 15 लाखापर्यंतचा फंड; Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये करा गुंतवणूक

Pune Anti Corruption | 2.5 लाखाची लाच घेताना पुण्यातील शिक्षण संस्थेच्या महिला अध्यक्षासह तिघे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात, शैक्षणीक क्षेत्रात प्रचंड खळबळ