महिलेच्या काखेत अचानक उगवले दोन एक्स्ट्रा ‘ब्रेस्ट’, स्तनपान देताना त्यांच्यातून सुद्धा लीक होत होते दूध

नवी दिल्ली : वृत्त संस्था – तुम्ही कधी चार ब्रेस्ट असलेल्या महिलेबाबत ऐकले आहे का ? सामान्यपणे प्रत्येक मनुष्याच्या शरीरात दोन ब्रेस्ट असतात. परंतु, लॉस एंजलिसमध्ये राहणारी सामंथा जेव्हा पहिल्यांदा प्रेग्नंट झाली, तेव्हा तिच्या अंडरआर्म्समधून सुद्धा दोन ब्रेस्ट निघाले. सर्वात मोठी गोष्ट ही होती की, सामंथा जेव्हा आपल्या मुलाला स्तनपान देत होती, तेव्हा काखेच्या खालील ब्रेस्टमधून सुद्धा दूध निघत होते.

दोन मुलांची आई सामंथा लॉस एंजलिसमध्ये राहते. प्रेग्नंसीच्या दरम्यान सामंथाचे दोन ब्रेस्ट तिच्या अंडरआर्म्समधून निघाले होते. तिच्यासाठी हे वाईट स्वप्नासारखे होते. मात्र, आता सामंथाची सर्जरीनंतर एक्स्ट्रा ब्रेस्टपासून सुटका मिळाली. सामंथाने सांगितले की, तिला या एक्स्ट्रा ब्रेस्टमुळे खुप वेदना होती.

काखेत लटकत होते ब्रेस्ट
आपला हा भीतीदायक अनुभव सामंथाने सर्जरीनंतर लोकांशी शेयर केला. तिने सांगितले की, ती पहिल्यांदा प्रेग्नंट होती तेव्हा तिचे अंडरआर्म्स मोठे झाले. काही दिवसानंतर तिला दिसले की, अंडरआर्म्सच्या खालून मांसाच्या गोळ्यासारखे काही तरी निघाले होते. जेव्हा ती आपल्या मुलीला दूध पाजत असे तेव्हा या एक्स्ट्रा ब्रेस्टमधून सुद्धा दूध निघत होते. मुलगी 6 महिन्यांची होण्यापूर्वी सामंथा दुसर्‍यांदा प्रेग्नंट झाली.

आता सर्जरीद्वारे सामंथाने आपले एक्स्ट्रा ब्रेस्ट काढून टाकले आहेत. परंतु अगोदरचे दिवस आठवत सामंथाने म्हटले हा अनुभव खुप वाईट होता. या एक्स्ट्रा ब्रेस्टचा आकार सुद्धा बी कपएवढा होता. लोक तिच्या एक्स्ट्रा बूब्सची थट्टा करत होते. जेव्हा त्याच्यातून दूध निघत असे तेव्हा तिला खुप वेदना होत असत. इतके की सामंथाच्या कॉन्फिडन्सवर सुद्धा याचा खुप वाईट परिणाम झाला होता. तिला आपल्या पतीच्या समोर सुद्धा कपडे काढण्यास संकोच वाटत असे.