‘पुरूष नेत्याशी संपर्क असला तरच महिला नेत्यांना निवडणुकीत उमेदवारीचं तिकीट मिळतं’ : राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा

हैदराबाद : पोलीसनामा ऑनलाईन – राजकारणात बहुतांश राजकीय पक्षांकडून निवडणूकीच्या वेळी ज्यांची प्रतिमा समाजात खराब आहे, ज्यांच्यावर आरोप आहेत अशा व्यक्तीना तिकीट दिले जाते. पण राजकीय पक्ष महिलांना उमेदवारी देणार नाहीत. इतकचे नाही तर जर कोणत्या महिलेला तिकीट मिळत असेल तर तिचा पुरुष नेत्याशी संपर्क असावा लागतो, असे विधान राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा (rekha sharma) यांनी केले आहे. हैदराबाद येथे मौलाना आजाद नॅशनल उर्दु महाविद्यालयाने आयोजित केलेल्या महिला शिबिरामध्ये निर्णयात महिलांचा सहभाग यावर त्या बोलत होत्या. वेबिनारच्या माध्यमातून शर्मा या शिबिरात सहभागी झाल्या होत्या. यावेळी रेखा शर्मा (rekha sharma) म्हणाल्या की, महिलांना निर्णय घेण्याचा अधिकार संसदेत आणि विधिमंडळात असणे गरजेचे आहे अन्यथा त्या फक्त घरातील काम करत राहतील, अशा महिला आहेत ज्यांच्याकडे चांगले मंत्रालय आहे.

 

 

 

 

 

परंतु त्यांची संख्या अत्यंत कमी आहे. राजकारणात बहुतांश राजकीय पक्षांकडून अशा व्यक्तींना तिकीट दिले जाते, ज्यांची प्रतिमा समाजात खराब आहे. अशा व्यक्तींवर आरोप आहेत, पण राजकीय पक्ष महिलांना उमेदवारी देणार देऊ इच्छित नाही कारण त्यांना वाटत ही महिला निवडणूक हरू शकते असेही त्यांनी सांगितले.