आकाशामध्ये दिसला ‘गुरु-शनि’ गळाभेटीचा नजारा; सुमारे 800 वर्षांनी जुळून आला ‘हा’ योग

पोलिसनामा ऑनलाईन – सूर्यास्तानंतर आज सायंकाळी आकाशामध्ये एक नजारा पहायला मिळाला, तो म्हणजे, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु आणि शनि एकमेकांच्या जवळ आले होते हा. हा योग सुमारे 800 वर्षांनी जुळून आला होता.

नैऋत्य दिशेला हे दोन ग्रह अशा कोणात आले होते की ते एकमेकांची भेट घेत आहेत, असेच वाटत होते. हा योग मकर राशीमध्ये होत आहे. लाखो लोकांनी या दोन ग्रहांची गळाभेट उघड्या डोळ्यांनी पाहिलीय. तसेच अनेक ठिकाणी दुर्बिनीच्या साह्यानेही हा नजारा पाहण्यात आला आहे. जानेवारीत मकर राशीमध्ये शनि प्रवेश करणार आहे. नोव्हेंबरमध्ये गुरु ग्रह मकर राशीत आला आहे. याला ग्रेट कन्झिकेशन्स असे म्हणतात.

गुरु आणि शनि हे दोन ग्रह यापूर्वी 1226 आणि 1623 मध्ये जवळ आले होते. त्यानंतर आता 21 डिसेंबर 2020 रोजी दोन ग्रह कमी अंतरावर येण्याचा दुर्मीळ खगोलीय योग आला होता.

पृथ्वीवरून अगदी 0.1 डिग्री अंतरावर दोन्ही ग्रहांना एकाचवेळी निरीक्षण आणि अभ्यासण्याची संधी मिळालीय. 20 वर्षांपूर्वी हे परस्परांचे जवळ आले होते. शनि सुमारे 12 डिग्री आणि गुरु 30 डिग्री पर्यंत पृथ्वीवरील वर्षात प्रवास करणार आहे. अर्थात प्रत्येक वर्षी 18 डिग्री जवळ येतील आणि जवळ येण्यास 20 वर्षे लागतील. शनि आणि गुरूमधील अंतर 730 दशलक्ष दिवस किलोमीटर आहे. शेवटच्या वेळी म्हणजेच 28 मे 2000 रोजी हे अंतर 1.25 डिग्री होते.

जाणून घ्या, कन्झिकेशन्स म्हणजे काय ?
कन्झिकेशन्स याचा अर्थ म्हणजे जेव्हा दोन वस्तू आकाशात एकमेकाच्या जवळ दिसतात. गुरु आणि शनि यांचा एक कन्झिकेशन्स- दर 20 वर्षांतून एकदाच घडले- याला एक ग्रेट कन्झिकेशन्स असे संबोधतात.