home page top 1

जागतिक पर्यावरण दिवस २०१९ : दैनंदिन जीवनातील ‘या’ वस्तूंच्या अति वापराने बिघडतेय पर्यावरणाचे ‘संतुलन’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – दरवर्षी ५ जून रोजी दरवर्षी जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. जागतिक पर्यावरण दिवस जागतिक प्रदूषण आणि जागतिक तापमान वाढीच्या समस्येमुळे साजरा करण्यात सुरुवात झाली होती. मात्र हि समस्या दररोज वाढतच आहे. मानव आणि प्रकृती यांच्या एक उत्तम नाते तयार करणे यामागचे उद्दिष्ट होते. तर आम्ही तुम्हाला सांगनार आहोत अशा गोष्टी ज्यामुळे तुम्ही पर्यावरणाला हानी पोहोचवत आहेत. तर चला पाहुयात कोणत्या आहेत या गोष्टी.

१) कोलगेट

दररोज वापरल्या जाणाऱ्या गोष्टींपैकी एक गोष्ट जी निसर्गास दररोज नुकसान पोहोचवते ती म्हणजे टूथपेस्ट. बरोबर आहे कारण अनेक टूथपेस्ट ब्रॅण्डमध्ये प्लास्टिक सूक्ष्मजीव आढळतात. दररोज वापरण्यात येणाऱ्या या कोलगेटचे दरवर्षी ८ दशलक्ष टन प्लास्टिक समुद्रात जाते. यामुळे समुद्री जीव आणि पर्यावरणास हानी पोहचवण्यास मदत होते.

२) सुशी चॉपस्टिक

सुशी किंवा चीनमध्ये खाण्यासाठी वापरले जाणारे पारंपरिक सुशी चॉपस्टिकमुळे देखील पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात धोका पोहचत आहे. या काड्या बनवण्यासाठी आशियातील क्रित्येक जंगले नष्ट झाली आहेत. या काड्या बनवण्यासाठी दरवर्षी ५०० ते ७०० कोटी काड्या बनवण्यासाठी ४० लाख झाडे कापण्यात येतात. त्याचबरोबर या काड्यांना लावण्यात येणाऱ्या केमिकलमुळे श्वसनासंबंधी आजार देखील होत असतात.

३) वेट वाइप्स

माणसांचे आरोग्य तसेच सुविधांसाठी अनेक कंपन्या नवीन उत्पादने बाजारात आणत असतात. त्यात वेट वाइप्स हे एक आहे. टिश्श्यू पेपर प्रमाणे वेट वाइप्स तुम्ही फ्लश करू शकता. मात्र यात देखील प्लास्टिक असते. त्यामुळे मल वाहून नेणाऱ्या वाहिन्या ब्लॉक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फ्लश केलेली हे पेपर पाईपलाईन द्वारे नदी किंवा समुद्रात पोहोचून घाण पसरवत असतात.

४) प्लास्टिक बॅग

प्लास्टिक बॅग तर सर्वात जास्त पर्यावरणाला हानी पोहोचवण्याचं काम करत असतात. त्यामुळे जगभरात अनेक देशांनी यावर बंदी घातली आहे. दरवर्षी १ लाख कोटी प्लास्टिक बॅग तयार होत असतात ज्या नष्ट होऊ शकत नाहीत. काही हजार वर्ष देखील त्या तशाच राहतात.

५) पेपर टी बॅग

पेपर टी बॅग देखील प्लास्टिक पासून बनवलेले असते, त्यामुळे ते देखी नष्ट होण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागतो आणि यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाला हानी पोहोचत असते.

त्यामुळे या सर्व गोष्टींचा वापर शक्यतो टाळावा किंवा त्याच्या वापराचे प्रमाण कमी आकारून आपल्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे.

Loading...
You might also like