NASA नं ‘मंगळा’वर जाण्यासाठी केली 13 वैज्ञानिकांची निवड, भारतीय वंशाच्या राजा चारींचा देखील समावेश (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अंतराळ विश्वात आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी अमेरिकेने १३ नवीन अंतराळवीर तयार केले आहेत. यात ११ अंतराळवीर हे अमेरिकन आहेत तर एक अंतराळवीर भारतीय वंशाचा असून त्यांचे नाव राजा चारी असे आहे तसेच दोन अंतराळवीर हे कॅनेडियन वंशाचे आहेत. यात सात पुरुष आणि सहा महिला अंतराळवीरांचा समावेश आहे. या टीममधील महिला आर्टेमिश मिशन अंतर्गत २०२४ मध्ये चंद्रावर पाऊल ठेवतील, तर २०३० मध्ये या अंतराळवीरांपैकी कुणी पहिल्यांदाच मंगळावर पाऊल ठेवेल.

शुक्रवारी अमेरिकेच्या अंतराळ संस्था जॉनसन स्पेस सेंटर येथे प्रथमच भव्य पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला ज्यामध्ये त्या सर्वाना जगाचा परिचय करून देण्यात आला. १८ हजाराहून अधिक आवेदनामधून १३ अंतराळवीरांची निवड करण्यात आली. नासाचे एडमिनिस्ट्रेटर जिम ब्राइडेनस्टाइन म्हणाले की, ‘हे सर्व अंतराळवीर आपल्या कामाने २०२४ आणि २०३० च्या मिशनच्या आधारे जगाला आपले काम दाखवतील.’ सर्व वैज्ञानिक अंतराळ यान बनवण्यासाठी आणि अवकाशात उपस्थित वैज्ञानिकांची मदत करतील. या सर्व लोकांचा ५०० अंतराळवीरांच्या निवड यादीमध्ये समावेश आहे ज्यांना भविष्यात अंतराळ प्रवासात जाण्याची संधी मिळणार आहे.

भारतीय वंशाचा पहिला पुरुष अंतराळवीर
भारतीय वंशाचे बरेच लोक अमेरिकन अंतराळ संस्था नासासाठी काम करतात. पण अंतराळवीर म्हणून भारतीय वंशाच्या महिला वैज्ञानिकांनी सर्वात आधी बाजी मारली होती. यात कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांची नावे सुवर्ण अक्षरांनी लिहिलेली आहेत. राजा चारी हे भारतीय वंशाचे पहिले पुरुष आहेत जे की नासासाठी अंतराळवीर म्हणून काम करणार आहेत.

हैदराबाद चे होते चारी यांचे वडील
अवकाश वैज्ञानिक राजा चारी यांचे वडील श्रीनिवास चारी हे हैदराबाद येथील रहिवासी होते. ओसमानिया यूनिवर्सिटी येथून इंजीनियरिंग चे शिक्षण घेऊन ते १९७० च्या दशकात अमेरिकेत गेले होते. पदव्युत्तर शिक्षण संपल्यानंतर त्यांनी पेगी चारीशी लग्न केले आणि २५ जून १९७७ रोजी राजा यांचा जन्म झाला. २०१० मध्ये ६७ व्या वर्षी श्रीनिवास चारी यांचे निधन झाले.

एमआयटीकडून एयरोनॉटिक्समध्ये पदवी
राजा चारी यांनी यूएस एअरफोर्स अकॅडमी मधून एस्ट्रोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. यानंतर त्यांनी मैसाच्युसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कडून एरोनॉटिक्स आणि एस्ट्रोनॉटिक्समध्ये पदवी प्राप्त केली आहे. तसेच त्यांनी नेव्ही पायलट स्कूल मधून प्रशिक्षण देखील घेतले आहे. नासा मध्ये सामील होण्यापूर्वी अमेरिकन एअरफोर्स मध्ये ते लेफ्टनंट कर्नल देखील होते. तसेच ४६१ फ्लाइट टेस्ट स्क्वॉर्डन चे कमांडर होते आणि एफ -३५ इंटिग्रेटेड टेस्ट फोर्सचे संचालक म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.

दोन वर्षापर्यंत चालले प्रशिक्षण
१३ वैज्ञानिकांचे प्रशिक्षण जवळपास दोन वर्षांपर्यंत चालू होते. या काळात सर्व वैज्ञानिकांना अवकाशातील बारीक सारीक गोष्टी सांगण्याव्यतिरिक्त स्पेसवॉक, रोबोटिक्स आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशन सिस्टम च्या बद्दल माहिती दिली गेली. तसेच टी -३८ जेट आणि रुसी भाषेचे प्रशिक्षण देण्यात आले.

नासा जवळ ४८ अवकाश अंतराळवीर
नासा जवळ आता ४८ अवकाश अंतराळवीर आहेत जे की पूर्णपणे सक्षम आहेत. नासा या संख्येला वाढविण्यासाठी येणाऱ्या काळात आवेदन जारी करू शकते. नासाची योजना येणाऱ्या दशकात या संख्येला शेकडोमध्ये रूपांतरित करण्याची आहे ज्यातून अवकाश विज्ञानाच्या जगाला गती देण्यात येईल.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/