Yavatmal News | दुर्देवी ! हेलिकॉप्टरच्या पंखांनीच केला ‘रँचो’चा घात, प्रात्याक्षिक करताना ध्येयवेड्या तरुणाचा मृत्यू

यवतमाळ न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – आपलं स्वप्न साकारण्यासाठी एका ध्येयवेड्या तरुणाने स्वत: तयार केलेल्या हेलिकॉप्टरची चाचणी करताना त्याचा दुर्दैवाने अपघाती मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना यवतमाळमध्ये (Yavatmal News) समोर आली आहे. यवतमाळमधील (Yavatmal News) या घटनेने महागाव तालुक्यातील फुलसांगवी गावावर शोककळा पसरली आहे. शेख इस्माईल उर्फ मुन्ना हेलिकॉप्टर शेख इब्राहिम Shaikh Ismail alias Munna Helicopter Sheikh Ibrahim (वय-28) असे या ध्येयवेड्या तरुणाचे नाव आहे. ही दुर्दैवी घटना मंगळवारी (दि.10) रात्री दीडच्या सुमारास घडली.

मुन्नाने सिंगल सिट हेलिकॉप्टर (Single seat helicopter) बनविले होते. मागील तीन-चार वर्षापासून हे हेलिकॉप्टर बनवण्यासाठी घेत होतता. हळूहळू त्याचे हेलीकॉप्टर बनवण्याचे स्वप्न (helicopter dream) पूर्ण होण्याच्या मार्गावर होते. 15 ऑगस्ट रोजी याच हेलिकॉप्टरचे प्रात्याक्षिक घेऊन पेटंट मिळविण्याची त्याची लगबग सुरू होती. मात्र, मंगळवारी हेलिकॉप्टरच्या मागच्या पंखात बिघाड होऊन तो वरती फिरणाऱ्या पंखावर आदळला आणि हे पाते केबीनमध्ये बसलेल्या मुन्नाच्या डोक्यात कोसळले. यात त्याचा मृत्यू झाला. हेलिकॉप्टर तयार करुन आकाशात उंच भरारी घेण्याचे स्वप्न होते. मात्र, नियतीला वेगळेच मान्य होते. याच हेलिकॉप्टरची चाचणी घेताना त्याला मृत्यूने गाठले. त्याला परिसरामध्ये मुन्ना हेलिकॉप्टर या नावाने ओळखले जात होते.

 

मुन्ना हा कष्टाळू मुलगा होता. ते केवळ 8 वी पर्यंत शिकला होता.
परंतु त्याचे ध्येय खूप मोठे होते. घरची परिस्थिती हालाकीची असल्याने तो एका वेल्डिंगच्या दुकानात दिवसभर काम करत होता. दुकानातील काम संपल्यानंतर तो हेलिकॉप्टर तयार करण्याचे काम करत होता.
हेलिकॉप्टर जवळपास पूर्ण झाले हेते.
हेलिकॉप्टर निर्मितीसाठी मारुती 800 (Maruti 800) चे इंजीन वापरले होते.
याच्या तो सारख्या चाचण्या घेत होता.
या चाचण्यात त्रुटी आढळल्यानंतर तो पुन्हा हेलिकॉप्टरमध्ये आवश्यक त्या सुधारणा करीत होता.
याची चाचणी करताना दुर्दैवी अपघात झाला.

हेलिकॉप्टरचे प्रात्यक्षिक घेत असतानाच हेलिकॉप्टरच्या मागच्या पंख्यात बिघाड झाला
आणि अवघ्या काही क्षणातच तो पंखा तुटून वरती फिरणाऱ्या मोठ्या पात्यावर आदळला.
हेच पाते हेलिकॉप्टरच्या केबीनमध्ये बसलेल्या शेख इस्माईल उर्फ मुन्नाच्या (Sheikh Ismail alias Munna) डोक्याला लागले.
यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली.
त्याला उपचारासाठी पुसदला (Pusad) नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.
मुन्नाच्या या अकस्मात अपघाती निधनामुळे गावावर शोककळा पसरली आहे.

Web Title : Yavatmal News : 24-year-old man dies after helicopter blade falls on his head

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Spa Center In Pimpri Chinchwad | स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स ‘रॅकेट’चा पर्दाफाश, एकाला अटक

Vitamin D Benefits | तणाव दूर करण्यासाठी खुप महत्वाचे आहे ‘व्हिटॅमिन डी’ चे सेवन, जाणून घ्या 10 फायदे आणि सेवनाची पद्धत

Pune Crime | बजाज फायनान्सलाही सायबर चोरट्यांचा ‘झटका’; कंपनीच्या नावाने आर्थिक फसवणूक केल्याने व्यवसायाला ‘फटका’