योगगुरु बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘मी लसीकरणाचा विरोधात नाही; पण….’

बहुजननामा ऑनलाइनः जगभरात कोरोनाचा थैमान सुरू आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जगभरात लसीकरण मोहीम सुरु केली आहे. पण लसीकरणावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. लस घेतल्यानंतरही अऩेकांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यांना एकदा कोरोना झाला होता त्यांना 6 महिन्यात पुन्हा झाला. यावर योगगुरु बाबा रामदेव म्हणाले की, लसीकरणाच्या सहा महिन्यांनंतर रोग प्रतिकारक क्षमता संपते. अशात सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क व्यतिरिक्त आपली इम्युनिटी वाढवणे आवश्यक आहे. यासाठी गिलोय आणि तुळशीच सेवन करावे आणि अनुलोम-विलोम योग करावा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. तसेच आपण कोरोना लसीकरणाच्या विरोधात नसल्याचेही बाबा रामदेव यांनी स्पष्ट केले आहे.

जगभरात बुधवारी (दि. 7) आंतरराष्ट्रीय आरोग्य दिवस साजरा झाला. या निमित्ताने बाबा रामदेव यांनी एका वृत्तवाहिनाशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. बाबा रामदेव म्हणाले की, लसीकरणानंतर शरीरात ज्या अँटीबॉडीज तयार होतात. जर तुम्ही योग केला तर 30 ते 50 टक्के अधिक अँटीबॉडीज वाढतात. त्यामुळे लसीकरणासोबतच योग करणेही गरजेचे आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे लोकांचा मृत्यू होत नाही. तर बीपी, रेस्परेटरी आणि हृदयासारख्या गंभीर समस्यांमुळे लोकांचा मृत्यू होत असल्याचा दावा त्यांनी केला. कोरोनापासून वाचण्यासाठी मास्कचा वापर नियमित करा.पण त्यासोबतच योग आणि आयुर्वेदाचा डबल डोसही नक्की घ्यावा असे ते म्हणाले. कोरोनामुळे अनेकदा पचनाच्या समस्या निर्माण असतात. त्यामुळे पचनासाठी चांगल्या असतील अशाच पदार्थांचे सेवन करावा असा सल्ला त्यांनी दिला.