#YogaDay 2019 : ‘उणे’ २० अंश सेल्सिअस तापमानात लडाखमध्ये ITBP जवानांची योगासने

लडाख : वृत्तसंस्था – जगभरात आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. भारतातील अनेक ठिकाणी योगविषयक जागृती करण्यासाठी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यानुसार आज पहाटेपासूनच योग शिबिरांना सुरुवात झाली आहे. या योग दिनात भारतीय जवानांनीही आपला उस्फूर्त सहभाग नोंदवला. कुठे पाण्यामध्ये तर कुठे बर्फामध्ये, भारतीय जवानांनी योगासने केली. उत्तर लडाखमध्ये इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांनी १८ हजार फूटांवर जाऊन उणे २० अंश सेल्सिअस तापमानात योग करून एक नवीन रेकॉर्ड बनवला आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिन –

दरवर्षी २१ जून रोजी हा दिवस साजरा करण्यात येतो. हा वर्षातील सर्वांत मोठा दिवस असतो. यंदा ‘क्लायमेट अ‍ॅक्शन’ ही संकल्पना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेत भाषण करताना योग दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर ११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या १९३ सदस्यांनी २१ जून रोजी योग दिवस साजरा करण्याच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली.

पंतप्रधान मोदी यांनी आज रांची येथील प्रभात तारा मैदानावर चाळीस हजार लोकांच्या बरोबर योगासाधना केली. पंतप्रधान मोदींनी नागरिकांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. लोकांनी योगाला आपल्या जीवनशैलीचा भाग बनवावा. योग करा, निरोगी राहा, असा संदेश मोदींनी यावेळी दिला.

आरोग्यविषयक वृत्त –

एक रामबाण उपाय जो तुम्हाला म्हातारपणीही देतो तारूण्याचा अनुभव 

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो 

“केळी” आरोग्यासाठी उपयुक्त 

बाहेर जेवण करणे ठरू शकते मधुमेहाला निमंत्रण