‘अंतर्वस्त्र घालायची विसरलीस तू…’; प्रियांका चोप्रा पडली ट्रोलिंगला बळी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलीवूडची देसी गर्ल म्हणजेच प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर खूपच सक्रिय असल्याचे दिसते. ती वेगवेगळे लूक्स परिधान करत असते ज्यामुलं तिच्या लूक्समुळे कधी लोक तिची स्तुती करतात तर कधी तिला ट्रोल करतात. मात्र, प्रियांका कधीच या सगळ्याकडे लक्ष देत नाही. प्रियांकाने नुकतीच BAFTA मध्ये हजेरी लावली होती, त्यावेळी तिने परिधान केलेल्या जॅकेटमुळे ती ट्रोल झाली आहे.

‘British Academy Film Award’ म्हणजेच BAFTA हा लोकप्रिय पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याचं हे ७२ वा वर्ष होतं. या पुरस्कार सोहळ्यात अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. इथेच प्रियांका आणि तिचा पती निक जोनसदेखील उपस्थित होते. प्रियांकाने यावेळी गुलाबी रंगाचे नक्षीदार जॅकेट आणि पांढऱ्या रंगाची पॅन्ट परिधान केली होती. प्रियांकाच्या या फोटोला बघता बघता ६ लाख पेक्षा जास्त लोकांनी लाइक केले.

मात्र, या फोटोज वरून अनेकांनी प्रियांकाला ट्रोल केले आहे. एक इंस्टाग्राम युसर म्हणाला, ‘अंतर्वस्त्र परिधान करायला विसरली’. तर दुसरा नेटकरी म्हणाला, ‘आपली संस्कृती आणि परंपरा विसरू नकोस.’ प्रियांकाने या पुरस्कार सोहळ्यात आणखी एक ड्रेस म्हणजेच काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. प्रियांकाचे या सोहळ्यातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका फोटोंमध्ये प्रियांकासोबत निक जोनस देखील दिसत आहे.