तरूणांना शारीरीक संबंध ठेवण्यापेक्षा ‘या’ कामात येतेय खुपच ‘मजा’, शोधात झाला खुलासा

नवी दिल्ली : वृत्त संस्था – रिलेशनशिपमध्ये आलेल्या सर्व लोकांनी शारीरीक संबंध ठेवण्यासच प्राथमिकता द्यावी असे आवश्यक नाही आणि ही गोष्टी नुकत्याच झालेल्या संशोधनात स्पष्ट झाली आहे. या संशोधनानुसार, तरूण व्हिडिओ गेमसाठी शारीरीक संबंध ठेवणे सोडून देऊ शकतात.

या संशोधनात 2000 तरूण पुरुष अणि महिलांचा समावेश करण्यात आला. या स्टडीनुसार, त्यांचा मागील वर्षात नॉन-रोमँटिक सेक्शुअल एन्काऊंटर 11.7 टक्केने वाढून 15.2 टक्के झाला आहे. द टेलीग्राफनुसार 18 ते 24 वर्षाच्या पुरुषांसाठी हा 18.9 टक्क्याने वाढून 30.9 टक्के झाला आहे.

या वयाच्या महिलांच्या कॅज्युयल सेक्स लाईफमध्ये घसरणीचे सर्वात मोठे कारण त्यांचे दारू पिणे होते. तिकडे पुरुषांच्या सेक्स लाईफवर दारू आणि जुगार खेळण्याचा सर्वात जास्त प्रभाव होता.

या संशोधनात भाग घेणार्‍या 10 टक्के सहभागींनुसार, त्यांच्या सेक्स लाईफवर परिणाम होण्याचे कारण हे होते की, ते आपल्या आई-वडीलांसोबत राहत आहेत. स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क अणि रटगर्स युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनात हे सांगितले आहे.

न्युकॅस्टल युनिव्हर्सिटीमध्ये इन्स्टीट्यूट फॉर हेल्थ अँड सोसायटीचे प्रोफेसर सायमन फॉरेस्ट यांनी आणखी एक युक्तिवाद समोर मांडला आहे. त्यांच्यानुसार, तरूण पुरूष आर्थिकदृष्ट्या आपल्या कुटुंबावर अवलंबून राहतात आणि आपल्या कुटुंबासोबतच राहतात, ज्याचा त्यांच्या रिलेशनशिपवर परिणाम होतो. कुटुंबासोबत राहिल्यामुळे स्वातंत्र्याची कमतरता एक महत्वाचे कारण असू शकते. संशोधकांनी हे सुद्धा सांगितले की, सध्याच्या काळात ऑनलाइन पोर्नोग्राफीची सहज आणि मोठी उपलब्धता सुद्धा इंटिमेट रिलेशनशिपला थेट प्रकारे प्रभावित करत आहे.