लोणावळ्याच्या तुंगार्ली धरणात तरुण बुडाला शोध मोहीम सुरू

लोणावळा पोलीसनामा ऑनलाइन – लोणावळ्यातील तुंगार्ली धरणात एक तरुण बुडाला असून दुपारी दोनच्या सुमारास ची घटना आहे. साद घिवाला असं 23 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो अद्यपाही सापडला अनुस लोणावळा शिवदुर्ग रेस्क्यू टीमकडून शोध मोहीम सुरू आहे. साद मुंबईच्या जोगेश्वरी वेस्ट येथून मित्रांसमवेत आला होता.तीन तरुण आणि तीन तरुणी असे सहा जण फिरायला आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार,तुंगार्ली धरणात दुपारी दोन च्या सुमारास साद जावेद घिवाला वय- २३ रा.जोगेश्वरी वेस्ट मुंबई बुडाला असून अद्यापही तो सापडलेला नाही.साद हा त्याच्या मित्रांसोबत आज तुंगार्ली धरण परिसरात पर्यटनासाठी आला होता.धरण पाहताच सर्व मित्रांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही.सादसह सर्व जण पाण्यात उतरले.परंतु साद हा पोहण्यात परिपक्व नव्हता त्यामुळे तो पाण्यात बुडाला.मित्रांना काही समजण्याच्या आत तो दिसेनासा झाला.या घटनेची माहिती तात्काळ लोणावळा पोलिसांना देण्यात आली आहे.दुपारी दोन वाजल्यापासून साद चा शोध लोणावळा शिवदुर्ग टीम घेत आहे.दरम्यान साद चे आई वडील घटनास्थळी दाखल झाले असून आपला मुलगा बुडल्याचे दुःख अनावर होत आहे.
अमोल परचंड, महेश मसने राजु पाटील, राहुल देशमुख, तुशार केंडेसागर कुंभार, निकेत तेलेंगे, दुर्वेश साठे, अनिकेत आंबेकर,स्वप्निल भांगरे,गणेश गायकवाड, अनिल सुतार, मधुर मुगंसे, राजु कडु,आनंद गावडे, सुनिल गायकवाड, विकास मावकर, हरपल जाधव,सौरभ मावकर, आकाश अंभोरे, दिनेश पवार अस शोध मोहीम करणाऱ्या लोणावळा शिवदुर्ग टीमच्या सदस्यांची नावे आहेत.