Zee Marathi | झी मराठीवरील ‘हा’ शो घेणार प्रेक्षकांचा निरोप ; तर ‘या’ नवीन दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

पोलीसनामा ऑनलाइन : Zee Marathi | आजकाल टेलिव्हिजनवर अनेक धाटनीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटील्या येत असतात, तर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यातही या मालिका काही मागे राहत नाहीत. अशातच आता झी मराठी वाहिनीवर दोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मात्र, त्याआधी जी मराठीवरील ‘फू बाई फू’ नवे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. मात्र, एका महिन्यातच ही मालिका आता प्रेक्षकांपासून निरोप घेत आहे. त्या जागी दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. (Zee Marathi)

17 डिसेंबरला ‘फू बाई फू’ हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे, तर या जागी 21 डिसेंबरपासून लोकमान्य ही मालिका रात्री साडेदहा वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही ऐतिहासिक मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. लोकमान्य टिळकांची यशोगाथा सांगणाऱ्या या मालिकेत अभिनेता क्षितिज दाते लोकमान्य टिळकांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. (Zee Marathi)

तर रात्रीच्या दहाच्या स्लॉटमध्ये ‘अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूसाई’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला
येणार आहे. या मालिकेमध्ये सासु सुनेची हलकी फुलकी कॉमेडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
तर या मालिकेत अभिनेत्री सुकन्या मोरे सासूच्या भूमिकेत दिसणार आहे तर अभिनेत्री स्वानंदी टिळेकर
सुनेच्या भूमिकेत दिसणार आहे. टेलिव्हिजन विश्वात पहिल्यांदाच साडेनऊ आणि दहा च्या स्लॉटला आजवर
कधी मालिका दिसल्या नाहीत यावेळी झी मराठी नवा प्रयोग करू पाहत आहे. याला प्रेक्षकांचा किती प्रतिसाद
मिळेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title :-  Zee Marathi | fu bai fu will be replaced by lokmanya and aga aga sunbai kay mhanta sasubai new serial on zee marathi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Haveli Tahsildar Trupti Kolte Suspended | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते निलंबित; हडपसर जमीन प्रकरण व कोरोना काळातील खरेदी भोवली?

Diabetes Joint Pain | ब्लड शुगर वाढल्याने का होते सांधेदुखी? ‘या’ पद्धतींनी होऊ शकते सुटका; जाणून घ्या