Zero Interest Loan | मराठा तरुणांना व्यावसायासाठी बीनव्याजी मिळणार कर्ज

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील तरुणांनी केवळ नोकरीवर अवलंबून न राहता, व्यावसायात उतरावे, स्वत:चा व्यवसाय सुरु करावा, यासाठी त्यांना अर्थसहाय्य (Zero Interest Loan) मिळावे, यासाठी सरकार आणि सामाजिक संस्था प्रयत्नशील असतात. त्यातूनच आता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे (Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal) होतकरु तरुणांना दहा हजार रुपये ते एक लाख रुपये बीनव्याजी (Zero Interest Loan) कर्ज देण्याची योजना जाहीर केली आहे.

सदर योजना मराठा समाजातील तरुणांसाठी आहे. या योजानेंतर्गत तरुणांना दहा हजार ते एक लाख रुपयांपर्यंत बीनव्याजी कर्ज मिळणार आहे. त्यामुळे मराठी उद्योजकांची वाढ होईल, असा शासनाचा हेतू आहे. तसेच या कर्जावर कोणतेही व्याज आकारण्यात येणार नाही. या योजनेचा लाभ घेऊ ईच्छिणाऱ्या नवउद्योजकांना पहिल्या हफत्यात 10 हजार, दुसऱ्या हफत्यात 50 हजार आणि अंतिम हफ्ता 1 लाख रुपये मिळणार आहे. कर्ज (Zero Interest Loan) घेतलेल्या रकमेचा विनियोग पाहून त्यांना पुढील रकमा देण्यात येणार आहे. त्यांनी घेतलेल्या कर्जाचा वापर उद्योगासाठीच झाला आहे ना, याची पडताळणी केली जाणार आहे. तसेच घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड हा भाग देखील त्यात असणार आहे. घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड यावर पुढील हफ्ते मिळणार आहेत.

दहा हजार कर्ज घेतलेल्यांना कर्जाची परतफेड नियमित म्हणजे प्रतिदिन 10 रुपये करावी लागेल.
50 हजार घेतलेल्या कर्जधारकांना प्रतिदिन 50 रुपये आणि एक लाखाच्या कर्जधारकांना प्रतिदिन 100 रुपये प्रमाणे
परतफेड करावी लागणार आहे. या कर्जाच्या अर्जासाठी वयोमर्यांदा 18 ते 60 अशी ठेवण्यात आली आहे.

कर्ज काढण्यासाठी उमेदवाराला आवश्यक कागदपत्रे द्यावी लागणार आहेत.
आधार, रहिवासी पुरावा, उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि जातीचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रांची पुर्तता करावी लागणार आहे.

Web Title :- Zero Interest Loan | maratha youth will get interest free loans for business know in one click

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Medical Education in Marathi | हिंदीपाठोपाठ आता वैदकीय शिक्षण मराठीतून

Baba Ram Rahim | पॅरोलवर बाहेर आलेल्या बाबा राम रहिमचे नवे गाणे लाँच