‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री Zomato चा रेकॉर्ड; मिनिटाला 4,100 ऑडर्स, कंपनीच्या इतिसाहासातील आजवरचा सर्वात मोठा आकडा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   ऑनलाइन रेस्टॉरंट गाइड आणि फूड डिलिव्हिरी सेवा देणाऱ्या ‘झोमॅटो’ने नववर्ष स्वागताला नवा विक्रम केला आहे. ‘थर्टी फर्स्ट’च्या दिवशी ‘झोमॅटो’ला दर एका मिनिटामागे तब्बल 4100 ऑनलाइन फूड ऑडर्स मिळाल्या आहेत. याबाबतची माहिती खुद्द झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ दिपेंदर गोयल यांनी ट्विट करून दिली आहे. थर्टी फर्स्ट’च्या रात्री ‘झोमॅटो’ला मिळालेल्या तुफान प्रतिसादाने कंपनीच्या तांत्रिक टीमची झोप उडाल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘झोमॅटो’ च्या आजवरच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणात सेवा देण्याची ही पहिलीच वेळ असून हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गोयल यांनी 31 डिसेंबर रोजी संध्या 7 वाजून 53 मिनिटांनी ट्विट केले आहे. कंपनीच्या सिस्टममध्ये तुफान ऑडर्स आल्या आहेत. 1 लाख 14 हजार लोकांनी आताच्या घडीला ऑडर्स केल्या आहेत. देशात विविध ठिकाणी सध्या 20 हजार लोकांना सध्या बिर्याणीची ऑडर पोहोचविण्याचे काम सुरू आहे. तर16 हजार लोकांना पिझ्झाची डिलिव्हरी सुरू आहे. यातील 40 टक्क्यांहून अधिक जणांनी एक्स्ट्रा चीझ पिझ्झा ऑर्डर केला असल्याची माहिती त्यांनी ट्विटमध्ये दिली होती. भारताबाहेरुन विशेषत: यूएई, लेबनॉन, तुर्की येथूनही भारतातील त्यांच्या नातेवाईकांसाठी ऑर्डर केल्याचे गोयल यांनी म्हटले आहे.

‘झोमॅटो ‘च्या आजवरच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणात सेवा देण्याची ही पहिलीच वेळ असल्याचेही ते म्हणाले. 31 डिसेंबरला सायं 6 वाजून 14 मिनिटांना2,500 ऑडर्स ते रात्री 8 वाजून 22 मिनिटांना दर मिनिटामागे 4,100 ऑडर्स आल्यांचे गोयल यांनी सांगितले आहे. कोविड-19 मुळे देशात ठिकठिकाणी विविध निर्बंध लागू आहेत. महाराष्ट्रात महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 नंतर संचारबंदी आहे. त्यामुळे अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स 11 वाजताच बंद झाले. त्यात अनेकांनी यावेळी घरीच राहून नववर्षाचं स्वागत करणे पसंत केले होते. यात मुंबई महानगरपालिकेने थर्टी फर्स्टसाठी ऑनलाईन फूड ऑडर्ससाठी रात्री 11 नंतरही परवानगी दिली होती. त्यामुळे ऑनलाइन फूड डिलिव्हरी वेबसाइट्सना याचा मोठा फायदा झाल्याचे बोलले जात आहे.