अकरा लाखाचे विसरलेले दागिने अवघ्या चार तासात दिले मिळवून

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन

विश्रामबाग पोलिसांनी कारवाई करत एका व्यक्तीचे 350 ग्रॅम वजनाचे दागिने व रोख 50 हजार रुपये असा एकुण अकरा लाख रुपयाचा मुद्देमाल अवघ्या चार तासात मिळवून दिला आहे. कोल्हापुर मधील व्यावसायिक नितीन भुरमल शहा(रा. गुजरी कोल्हापूर) हे आपल्या पुतन्याच्या लग्ना करिता दागिने बनवण्यासाठी पुण्यात आले होते. खरेदी झाल्यानंतर पालखी चाैक येथून रिक्षातुन जात असताना दागिने असलेली सॅग ते रिक्षातच विसरले .सदर घडलेल्या घटनेची माहिती शहा यांनी विश्रामबाग पोलीस स्टेशनला दिली असता, तपास पथकाचे पोलीस उप- निरीक्षक महेंद्र पाटील व त्यांच्या सहकार्यांनी सदर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन अतिशय शिताफिने रिक्षा शोधुन काढला. व शहा यांचे दागिने त्यांच्या ताब्यात दिले.

सदरची कामगिरी विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक महेंद्र पाटील, पोलीस हवालदार शरद वाकसे, सचिन जगदाळे यांनी केली.