अग्नीशमन सेवा सप्ताह निमित्त क्रिकेट सामन्याचे उद्घाटन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन
अग्नीशमन सेवा सप्ताह’ निमित्त अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन झाले. हा कार्यक्रम आझम कॅम्पस येथे आज (बुधवारी) सकाळी ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे डॉ.पी.ए. इनामदार यांच्या हस्ते झाला.

मुख्य अग्नीशमन अधिकारी प्रशांत रणपिसे, विभागीय अग्नीशमन अधिकारी सुनील गिलबिले, सहाय्यक विभागीय अग्नीशमन अधिकारी दत्तात्रय नागलकर,सहाय्यक विभागीय अग्नीशमन अधिकारी रमेश बांगड,’आझम स्पोर्टस अॅकॅडमी’चे गुलझार शेख उपस्थित होते.