अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांची बदली झाल्याने महिला सेविकांचा पेढे वाटून आंनद उत्सव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

पुणे महापालिकेतील विविध विभागामध्ये काम करणाऱ्या 200 हून अधिक स्मार्ट या संस्थेच्या महिला सेविकांचा करार कायम करण्यास अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. त्यामुळे आमचे नुकसान झाले असून आज प्रेरणा देशभ्रतार यांची बदली झाल्याने आम्ही पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करित आहोत.अशी भावना यावेळी महिला कर्मचायांनी व्यक्त केली.

पुणे महापालिकेत मागील दहा वर्षांपासून विविध विभागामध्ये स्मार्ट संस्थेच्या माध्यमातून 200 हून अधिक महिला काम करत आहेत. मात्र त्यांचा करार कार्यान्वित करण्यास अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी नकार दिल्याने या पार्श्वभूमीवर महिला सेविकांना अनेक वेळा पत्र व्यवहार करून पालिकेत कायम करून घ्यावे. अशी मागणी देखील केली.

या मागणीची प्रशासन आणि सताधारी भाजप ने लक्ष द्यावे. यासाठी पंधरा दिवसापूर्वी मनसेच्या माजी नगरसेविका रुपाली पाटील यांनी महापालिकेच्या चौथ्या मजल्यावर जाऊन आंदोलन केले. तेव्हा लवकरच प्रश्न मार्गी लावू असे आश्वसन देण्यात आले. मात्र अद्याप पर्यँत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात न आल्याने केव्हा कामावर घेतात. याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.त्यात तेवढ्यात अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्या बदलीचा आदेश राज्य सरकारने काल बुधवारी दिले.तर त्यांच्या जागेवर अद्याप पर्यँत कोणाचाही नियुक्त करण्यात आली नाही.या सर्व घडामोडी घडून काही तास होत नाही. तोवर आज पुणे महापालिकेत या महिलांनी अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना पेढे वाटून आंनद साजरा केला. त्यांच्या समावेत मनसेच्या माजी नगरसेविका रुपाली पाटील या देखील होत्या.

या विषयी माजी नगरसेविका रुपाली पाटील म्हणाल्या की,प्रेरणा देशभ्रतार यांच्या निर्णयामुळे या महिलांना काम प्रशासनाने घेतले नाही. असा आरोप करीत त्या पुढे म्हणाल्या की, आता तरी प्रशासनाने कामावर घ्यावे अशी मागणी केली.जर या महिलांना कामावर लवकर न घेतल्यास आम्ही आणखी तीव्र लढा उभारू इशारा त्यांनी दिला.

स्मार्ट संस्थेच्या सेविका भारती भोजणे म्हणाल्या की, आम्ही मागील कित्येक वर्षापासून महापालिकेत काम करित आहोत. मात्र कोणतेही कारण न देता कामावरून कमी केले आहे. या बाबत अनेक वेळा पाठ पुरावा करून देखील प्रेरणा देशभ्रतार यांनी कामावर घेतले नाही. असा आरोप करीत त्या पुढे म्हणाल्या की, त्यांची बदली झाल्यामुळे आम्ही पेढे वाटून आंनद उत्सव साजरा करित असल्याचे त्यांनी सांगितले.