अपघातात पडलेल्या दाताचे ससूनमध्ये पाहिल्यांदाच यशस्वी पुनर्रोपण

पुणे: पोलीसनामा आॅनलाईन

ससून रुग्णालयाच्या दंत विभागातील डॉक्टरांना अपघातामध्ये तरुणाचा पडलेला दात बसविण्यास यश आले आहे. या प्रकारची शस्त्रक्रियेत दुसरा दात न बसवता तुटलेला दात बसविण्याची ही पहिलीच घटना आहे.

अपघातानंतर ससून रुग्णालयात हा महाविद्यालयीन तरुण उपचारासाठी दाखल झाला. प्रथमच पडलेला दात शस्त्रक्रियेद्वारे बसवून दाताचे यशस्वी पुनर्रोपण करण्यात आले.

तरुणाच्या वरच्या जबड्यातील एक दात पडलेला. दंतरोगतज्ज्ञ डॉ. समिर खैरे शस्त्रक्रिये दरम्यान पुर्नरोपण करण्याचा निर्णय घेतला. रुग्णाच्या मित्राने घटनास्थळी धाव घेत, पडलेला दात शोधून आणला. हा तुकडा पाहिल्यानंतर डॉक्टरांनी दाताची तपासणी केली. तेव्हा तो अखंड असल्याचे समजले. या तुकड्याचे निर्जंतूकीकरण केले, तसेच रुग्णाच्या तोंडातील जखम देखील सलाईन आणि औषधांनी स्वच्छ केली.

त्यानंतर शस्त्रक्रियेद्वारे दात बसवला. त्याला (स्प्लींटिंग) असे म्हणतात. तीन आठवडे स्प्लींट ठेवण्यात आले. तीन आठवड्यांच्या तपासणी नंतर स्प्लींट काढली. अशा प्रकारे अपघातामध्ये पडलेल्या दाताची पुर्नरोपण शस्त्रक्रिया ससून रुग्णालयात यशस्वी झाल्याची महिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी दिली.