अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नागपूर : पोलीसनामा

ओळखीच्या तरुणाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री घडली.

नागपूर : ओळखीच्या तरुणाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री घडली. अक्षय मेश्राम (वय २२) असे आरोपीचे नाव आहे.पीडित मुलगी (वय १५) प्रतापनगरात राहते. नेहमीप्रमाणे ती रविवारी सायंकाळी गार्डनमध्ये खेळायला गेली होती. खेळणे झाल्यानंतर ती रात्री ७.३० च्या सुमारास आपल्या घराकडे निघाली. वाटेत आरोपी अक्षय मेश्रामचे घर आहे. तो ओळखीचा असल्याने तिने त्याला पिण्यासाठी पाणी मागितले. आरोपीने पाणी देण्याच्या बहाण्याने तिला घरात बोलविले आणि तिच्यावर बलात्कार केला. मुलीने घरी परतल्यानंतर पालकांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपी मेश्रामची चौकशी सुरू आहे.