आंबोली पोलिसांची अमली पदार्थाविरोधी सर्वात मोठी कारवाई.

अंबोली : पोलीसनामाऑनलाईन

आंबोली पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कारवाई केली. यामध्ये एकूण तेरा किलो ४२० ग्रॅम पावडर व एक अर्टिगा मोटार असा एकूण दोन कोटी ७३ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी कृष्णा दिनेश चौधरी (वय :३१), मुकेश कृष्ण तकले (वय :३१) दोघांना अटक केली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने गुन्हा दाखल केला आहे.