आगामी सर्व निवडणुका काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढवणार : प्रफुल्ल पटेल

ADV

गोंदिया : पोलीसनामा आॅनलाईन

भंडारा- गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसह अागामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका, काॅंग्रेस- राष्ट्रवादी एकत्र लढवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काॅंग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर काॅंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात आघाडीच्या बाबतीत दिल्लीत चर्चा झाल्याचे ही पटेल यांनी गोंदियात बोलत असताना म्हटले आहे.

आगामी काळत होणाऱ्या निवडणूकांची मोर्चेबांधणी करण्यास राजकिय पक्षांनी आत्तापासूनच सुरूवात केली आहे. सत्ताधारी भाजप व शिवसेना यांनी देखील अनेक ठिकाणी विधानपरिषदेच्या निवडणूकांत एकत्र लढण्याची तयारी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी व काॅंग्रेस पक्षाने सुद्धा हम साथ-साथ है चा नारा दिला आहे. त्यामुळे निवडणूकांत विजयश्री खेचताना दोघांनाही चांगलीच कसरत करावी लागणार आहे.