उच्चदाबाच्या विजेच्या धक्क्याने चिमुकली 90 टक्के भाजली

शिल्पा माजगावकर
कोल्हापूर : पोलीसनामा आॅनलाईन

उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीचा स्पर्श होऊन कसबाबावडा इथल्या बिरंजे पाणंद येथे बारा वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. सीमा विलास लाखे असे या मुलीचे नाव आहे. तिला उपचारांसाठी छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ती या आपघातात ९० टक्के भाजली आहे.
कसबा बावडा परिसरातील बिरंजे पाणंद इथल्या श्री राम कॉलनीत सुवर्णा शिंदे यांचा बंगला आहे. या बंगल्यावरुन उच्चदाबाची विद्युत वाहीनी गेली आहे, तरीही शिंदे यांनी महापालिकेची परवाणगी न घेता बंगल्याचा तीसरा मजला वाढवला आहे. या बंगल्याच्या दुस-या मजल्यावर काल लाखे कुटुंबीय भाड्याने रहाण्यासाठी आले आहे. लाखे कुटुंबातील नातेवाईकांची मुलगी सिमा लाखे ही १२ वर्षीय मुलगी आज सकाळी या घरात आली होती. या वेळी ती तिस-या मजल्यावरील गच्चीत कपडे वाळत घालण्यासाठी आली असता तिचा स्पर्श घरावरून गेलेल्या  उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीला झाला . या वेळी तिच्या उजव्या हातातून करंट तिच्या शरिरात गेला आणि डाव्या पायातून करंट बाहेर पडला या मध्ये ती ९० टक्के भाजली आहे. या वेळी मोठ्ठा आवाज झाला आणि गच्चीतून धुराचे लोट आले. शेजा-यांनी तिला काठीच्या सहाय्याने विद्युत वाहिनी पासून दुर केले. तत्काळ तिला छत्रपती प्रमिला राजे रुग्णालायात दाखल केले.तिची प्रकृती चिंताजनक आहे.
बिरंजे पाणंद मध्ये अनेक नागरीकांनी विद्त वाहिनी खालीच अतिक्रमण करुन घरे बांधली आहेत. श्रीराम कॉलनी इथे ही विद्युत वाहिनीच्या खाली आपल्या बंगल्याचे मजले वाढवले आहेत. मात्र प्रशासनाने यासंदर्भात कल्पना असूनही याकडे दुर्लक्ष केले आहे. आजच्या या दुर्घटनेने हा सर्व प्रकार समोर आला आहे.