कणकवलीतील रेल्वे स्थानकावरील जनरल डब्यात सापडला दारुसाठा

सिंधुदुर्ग :पोलीसनामा आॅनलाईन

कणकवली रेल्वे स्थानकावर उभा असलेल्या अोखा एक्सप्रेसमध्ये कारवाई करत रेल्वे पोलिसांनी दारुसाठा जप्त केला. जप्त करण्यात आलेली दारुची किंमत ४ हजार ९०० रुपये आहे. रेल्वेची तपासणी करत असताना पोलिसांनी ही दारु पकडली.

शनिवार ७ एप्रिल रोजी ओखा एक्सप्रेसमध्ये ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी जप्त केलेली ही दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात देण्यात आली. जप्त करण्यात आलेली दारू गोव्याहून मुंबईकडे नेण्यात येत होती. ओखा एक्सप्रेस कणकवली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर थांबविण्यात आल्यानंतर पोलिसांनी डबे तपासले होते. यावेळी रेल्वेच्या जनरल डब्यात ही दारू सापडली. याप्रकरणाचा अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.