कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही – विनोद तावडे

ADV

पोलीसनामा ऑनलाईन

मुंबई : ज्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या १० किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा शाळा समायोजित करण्यात आल्या आहेत. शाळा समायोजित करताना शिक्षण हक्क कायद्यानुसार कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे, असे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

तावडे म्हणाले, २० पटसंख्येच्या खाली असलेल्या शाळा बंद करण्याबाबत निर्णय पूर्वी घेण्यात आला होता. परंतू पहिल्या टप्प्यात १० पटसंख्येपेक्षा कमी असलेल्या ५६८ शाळा समायोजित करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक व स्पर्धात्मक वातावरणात शिक्षण मिळावे हा शाळा समायोजित करण्यामागचा उद्देश आहे. समायोजित केलेल्या शाळातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळत आहे. शाळेच्या समायोजनामुळे एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण बंद होणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांची पटसंख्या जास्त आहे, अशी कोणतीही शाळा समायोजित करण्यात आलेली नाही. चुकीच्या पद्धतीने शाळांचे समायोजन करण्यात आले आहे, असे वाटत असल्यास अशा शाळा सदस्यांनी नावानिशी दिल्यास त्याबाबत चौकशी करण्यात येईल.