कुमारस्वामींच्या पत्नीची सोशल मीडियावर तुफान चर्चा

कर्नाटक वृत्तसंस्था

सोशल मीडियाच्या युगात कोण कधी चर्चेत येईल सांगता येत नाही . मागील काही दिवसापूर्वी पूजा वारीयर ही दक्षिणेतील अभिनेत्री तिच्या खास अदागीरीमुळे खूप चर्चेत आली होती. यांनतर आता चर्चा आहे ती कर्नाटकचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असलेल्या कुमारस्वामी यांच्या पत्नीची , त्यांचे फोटो सध्या मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. राधिका कुमारस्वामी असे त्यांचे नाव असून ,त्या अभिनेत्री आहेत. प्रोड्यूसर म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. कन्नड फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक मोठा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

16 डिसेंबर 1959 ला जन्म झालेले कुमारस्वामी यांनी 2 विवाह केले आहेत. पण त्यांचा दुसरा विवाह सर्वात जास्त चर्चेत होता. कुमारस्वामी यांनी पहिलं लग्न 1986 मध्ये अनिता कुमारस्वामी यांच्यासोबत केला. त्यांचा निखिल गौडा हा मोठा मुलगा आहे. कुमारस्वामींनी 2006 मध्ये कन्नड अभिनेत्री राधिका सोबत विवाह केला. कुमारस्वामी आणि राधिका यांच्या वयात खूप मोठं अंतर आहे. कुमारस्वामी यांनी जेव्हा 1986 मध्ये पहिला विवाह केला तेव्हा राधिकाचा जन्म झाला आहे.

2006 मध्ये एच.डी. कुमारस्वामी यांच्या सोबत विवाह केल्यानंतर ती चर्चेत आली होती. दोघांना एक मुलगी असून तीच नाव शमिका आहे. कर्नाटक निवडणुकीनंतर देशात ही निवडणूक चर्चेत आहे. पण राधिका कुमारस्वामी देखील गुगलवर ट्रेंड करत आहेत. गूगलवर अनेक लोक राधिका यांच्याबद्दल जाणून घ्यायला उत्सूक आहेत. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियात शेअर होत आहेत. यातील काही फोटो हे कुमारस्वामी यांच्यासोबतचेही आहेत. राधिका यांनी 14 व्या वर्षी कन्नड सिनेमामध्ये काम केले आहे. राधिका यांचा हा दुसरा विवाह आहे, त्यांच्या पहिल्या पतीचे निधन झालेले आहे.