कोंढव्यात ११ व्या मजल्यावरून उडी मारून ५६ वर्षीय महिलेची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील कोंढवा भागात ११ व्या मजल्यावरून उडी मारून ५६ वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या केलेली महिला सहाव्या मजल्यावर राहात होती. ही महिला ज्या इमारतीत राहते त्याच इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी मारल्याचे समजते.

फरजाना समद नायानी (वय ५३) रा. फ्लॅट नं. ३६, ६ वा मजला, भाग्यलक्ष्मी टाॅवर, कोंढवा खुर्द असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपास सुरु आहे.