कोरड्या विहिरीत पडलेल्या आस्वलाला दिले गावक-यांनी जीवदान

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन

पाण्याच्या शोधात वन्य प्राणी नागरी वस्तीकडे धाव घेत आहेत. अमरावती जिल्ह्यातील जंभाली येथे 60 फूट कोरडया विहिरित पडलेल्या अस्वलाला गावकऱ्यांनी जीवदान दिले.

पाण्याच्या शोधात असलेले एक अस्वाल जंभाली येथील हिरालाल कासदेकर यांच्या शेतातील कोरड्या विहिरीत पडले. गावक-यांनी याची माहिती दहिगावच्या वनपरीक्षेत्राचे एस. के. वानगे यांना दिली. घटना स्थळावर पोहचलेल्या वनविभागाच्या रेस्क्यू टीम ने स्थानिक गावकरी मंडळीच्या सहकार्याने अस्वलाला सुखरूप बाहेर काढून दिले मोकळ्या जंगलात सोडले. पाण्याच्या शोधात वन्यप्राणी नागरी वस्ती कडे धाव घेत असल्याचे दिसून येते,याकडे वनविभाग लक्ष्य देणार का?’ हाच प्रश्न वन्यप्रेमी करीत आहे.