खासदार निधीतून साने गुरूजी मंडळास रुग्णवाहिकेचे लोकार्पण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन
आंबील ओढा येथील नगरसेवक धीरज घाटे यांच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या साने गुरूजी तरूण मंडळास स्थानिक विकास निधीतून खासदार अनिल शिरोळे यांच्या वतीने रुग्णवाहिका देण्यात आली. पीएमसी कॉलनीत हा लोकार्पण सोहळा झाला. साने गुरुजी तरुण मंडळाच्या कामाची प्रशंसा शिरोळे यांनी केली. याप्रसंगी नगरसेवक धीरज घाटे, सीमाताई वस्ते, मनिषा घाटे, सरस्वती शेंडगे, राजाभाऊ शेंडगे आणि मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.