गणेश कला क्रीडा रंगमंच येथे वातानुकूलित यंत्रणा बसवावी : माजी आमदार मोहन जोशी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन 

पुणे शहरातील सर्वात जादा आसन क्षमतेचे गणेश कला क्रीडा रंगमंच असून त्या ठिकाणी वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात यावी.अशी मागणी माजी आमदार मोहन जोशी यांनी महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे पत्रकाद्वारे केली आहे.

यावेळी माजी आमदार मोहन जोशी म्हणाले की, गणेश कला क्रीडा रंगमंच येथे शहरातील विविध संस्थामार्फत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कला दालनाकडून महापालिकेला चांगले उत्पन्न मिळत असताना. तेथे येणाऱ्या नागरिकांना योग्य सुविधा दिल्या जात नाहीत ही खेद जनक बाब असून नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यात प्रामुख्याने या कला दालनात वातानुकूलित यंत्रणा नसल्याने आणखी त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. याची दखल महापौर आणि महापालिका प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.