गुंडांना घाम फोडणारी महिला आयपीएस आज मोस्ट वॉन्टेड

नवी दिल्ली : एका महिला आयपीएसमुळे भल्याभल्या गुंडाना घाम फुटायचा ही महिला अधिकारी आज मोस्ट वॉन्टेड आहे. पश्चिम बंगालची सीआयडी टीम सध्या माजी सुपरिडेंट आणि आयपीएस अधिकारी भारती घोष यांचा शोध घेत आहे. भारती घोष या एकेकाळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सर्वात जवळच्या मानल्या जायच्या.

सीआयडीचा आरोप आहे की, या महिला आयपीएस अधिकाऱ्याने 300 कोटींची जमीन खरेदी केली. सीआयडीकडे याबाबतचे पुरावे देखील आहेत. भारतीवर कथित रूपात आपल्या संपत्तीची चुकीची माहिती देण्याचा आरोप आहे. रिपोर्टनुसार भारती घोष यांना फरार घोषीत करण्यात आलं आहे. भारती यांचा पती देखील पोलिसांच्या रडारवर आहे. अवैधपणे वसूलीसह अनेक प्रकरणात आरोपी राजूच्या अटकेवर कोलकाता उच्च न्यायालयाने 15 मार्चपर्यंत स्थगिती आणली आहे. यादरम्यान घोष यांनी एक ऑडियो जारी करत सीआयडीच्या या कारवाईची निंदा केली आहे.

भारती घोष यांनी 29 डिसेंबर 2017 ला राजीनामा दिला आहे. आयपीएस अधिकारी भारती घोष यांना पश्चिम मेदिनीपूरमधून पोलीस अधीक्षक पदावरुन हटवल्याने त्यांनी पोलीस महासंचालकांकडे आपला राजीनामा दिला होता.