जागतिक महिला दिनानिमित्त ससून रुग्णालयात महाजनजागृती शिबिराचे आयोजन

पुणे : पोलिसनाम ऑनलाईन

जागतिक महिला दिनानिमित्त दि. 8 मार्च रोजी बै .जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय,पुणे येथे महाजनजागृती शिबाराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर ससून रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात सकाळी 9 ते 1 या वेळेत घेण्यात येणार आहे. या शिबिरात स्त्रियांमधील कर्करोगाचे निदान करण्यात येणार आहे. त्यामध्ये स्तन कर्करोग, सर्व्हायकल कॅन्सर व मुख कर्करोग, बोन मिनरल डेन्सिटी इत्यादींची तपासणी मोफत करण्यात येणार आहे. रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी दिली आहे.